Bribe Agrowon
ताज्या बातम्या

Akola Bribe News : मृत जनावरांच्या मोबदल्यासाठी ८ हजारांची मागितली लाच

Arrest In Bribe : लम्पी स्कीन आजाराने दगावलेल्या जनावरांच्या मदतीपोटी दाखल प्रस्ताव मार्गी लावण्यासाठी १० हजारांची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल झाली होती.

Team Agrowon

Akola News : लम्पी स्कीन आजाराने दगावलेल्या जनावरांच्या मदतीपोटी दाखल प्रस्ताव मार्गी लावण्यासाठी १० हजारांची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल झाली होती. यावर शुक्रवारी (ता. १६) रात्री पोलिसांनी कारवाई केली. जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्तांसह खासगी व्यक्तीला या प्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे.

तक्रारदाराच्या मालकीची जनावरे ‘लम्पी स्कीन’मुळे दगावली होती. त्यासाठी मदतीचा प्रस्ताव मंजूर करून मोबदला मिळवून देण्यासाठी सहायक आयुक्त प्रवीण राठोड यांनी १० हजार रुपयांची लाच मागितली होती.

तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. ही रक्कम राठोड यांनी खासगी व्यक्ती राजीव खाडे याच्यामार्फत स्वीकारली. शहरातील तुकाराम चौक परिसरात ८ हजार रुपयांची लाच घेताना त्यांना पकडण्यात आले.

तक्रारदाराच्या दोन जनावरांचा लम्पी स्कीन आजाराने मृत्यू झाला होता. त्यामुळे तक्रारदाराला मदत म्हणून ३२ हजार रुपये लाभ मिळणार होता. हा लाभ मिळवून देण्यासाठी राठोड यांनी १० हजार रुपयांची लाच तक्रारदाराकडे मागितली, असे तक्रारीत म्हटले होते. तडजोडीअंती ८ हजार रुपये देण्याचे निश्‍चित झाले.

ही रक्कम खाडे याने स्वीकारली. पोलिसांनी खाडे याच्यासह राठोड यांनाही ताब्यात घेतले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक मारुती जगताप, अपर पोलिस अधीक्षक देविदास घेवारे, अरुण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक शैलेश सपकाळ व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

MIDC Long March : एमआयडीसीविरोधात वर्णे ते सातारा ‘लाँग मार्च’

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची कारवाई; अनुदानाची वसुली, तुरुंगवासाचीही शक्यता?

Skill Training Centre: मराठवाड्यात सुरू होणार अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्र

SCROLL FOR NEXT