agricultural pumps
agricultural pumps  Agrowon
ताज्या बातम्या

Electricity : कृषिपंपांना ९६०४ नवीन वीजजोडण्या

Team Agrowon

सोलापूर ः रब्बी हंगामात शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी वीजजोडणीसाठी प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांना तत्काळ वीज जोडणी व तातडीने नादुरुस्त रोहित्रे (ट्रान्स्फॉर्मर) बदलण्यासाठी दिलेल्या आदेशाची पुणे प्रादेशिक विभागात युद्धपातळीवर अंमलबजावणी करण्यात येत आहे. गेल्या दीड महिन्यात ९६०४ नव्या कृषिपंपांना वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत, तर २०३६ नादुरुस्त रोहित्रे बदलण्यात आली आहेत.

पुणे विभागातील पुणे, सांगली, सोलापूर, सातारा व कोल्हापूर येथील नादुरुस्त रोहित्रांचा व कृषिपंप प्रादेशिक विभागातील पाचही जिल्ह्यांत नादुरुस्त शेतपंपाचे रोहित्रे बदलण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत असून, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल आणि महावितरणचे संचालक संजय ताकसांडे हे नादुरुस्त रोहित्रे बदलण्याच्या कामाचा दैनंदिन आढावा घेत आहेत.

नुकतेच पुणे येथे पार पडलेल्या आढावा बैठकीत शेतकऱ्यांना कृषिपंपांच्या नवीन वीजजोडण्या लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार कोटेशनची रक्कम भरून प्रलंबित असलेल्या वीज जोडण्या येत्या मार्च २०२३ पर्यंत देण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांनी युद्धपातळीवर कार्यवाही करावी, विविध योजनांसह क्षेत्रीय कार्यालयांना निधीदेखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे नवीन वीजजोडण्या देण्यात कोणतीही अडचण नाही, असेही श्री. ताकसांडे यांनी या वेळी सांगितले. नोव्हेंबरमध्ये जवळपास आठ हजार कृषिपंप ग्राहकांना वीजजोडण्या देण्यात आल्या, तर चालू डिसेंबर महिन्यात जवळपास १६०४ नवीन कृषिपंपांना वीजजोडण्या देण्यात आल्या.

मागेल त्याला वीज

पुणे विभागात २९ नोव्हेंबरपर्यंत ११४५ रोहित्रे नादुरुस्त होती. त्यापैकी ११३९ रोहित्रे ही तत्काळ बदलण्यात आली. तर २९ नोव्हेंबर ते १२ डिसेंबर या कालावधीत ११५३ रोहित्रे नादुरुस्त असून, त्यापैकी ८९७ रोहित्रे ही बदलून देण्यात आली आहेत. तर उर्वरित २५६ रोहित्रे बदलण्याची कारवाई युद्धपातळीवर करण्यात येत आहे. मार्च २०२३ पर्यंत मागेल त्याला तत्काळ वीजजोडण्या देण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आल्याची माहितीही या वेळी देण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT