Crop Insurance Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage Compensation : अतिवृष्टिबाधितांसाठी ९३ कोटींवर निधी मंजूर

१ लाख ४७ हजार ६१३ बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने आर्थिक मदतीसाठी ९३ कोटी २० लाख रुपये निधी

Team Agrowon

परभणी ः यंदाच्या (२०२२) सप्टेंबर ते ऑक्टोंबर या कालावधीत झालेली अतिवृष्टी (Heavy Rain) आणि पुर परिस्थितीमुळे परभणी चार तालुक्यातील हिंगोली जिल्ह्यातील एका तालुक्यातील असे दोन जिल्ह्यातील पाच तालुक्यातील १ लाख ४७ हजार ६१३ बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने आर्थिक मदतीसाठी ९३ कोटी २० लाख रुपये निधी वितरणास गुरुवारी (ता. १७) काढण्यात आलेल्या शासन निर्णयाद्वारे मंजुरी देण्यात आली आहे.

सप्टेंबर -ऑक्टोंबर मधील परतीचा पाऊस,अतिवृष्टीमुळे परभणी जिल्ह्यातील परभणी,सेलू,पाथरी,पूर्णा या चार तालुक्यांतील ९२ हजार ७३७ शेतकऱ्यांच्या ५६ हजार १७५ हेक्टर आणि हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील ५४ हजार ८७६ शेतकऱ्यांच्या १२ हजार ३६० हेक्टरवरील जिरायती पीकांचे ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने निधीची मागणी केली होती.

बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रतिहेक्टरी १३ हजार ६०० रुपये नुसार परभणीसाठी ७६ कोटी रुपये आणि हिंगोली साठी १६ कोटी रुपये निधी वितरणास मंजुरी देण्यात आली आहे. कमाल ३ हेक्टरच्या मर्यादेत बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर मदतीची रक्कम जमा केली जाईल.

सततच्या पावसाने बाधितांसाठी २४७ कोटी रुपयाची मागणी

सप्टेंबर - ऑक्टोंबर महिन्यातील सततच्या पावसामुळे परभणी, जिंतूर, सेलू,मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पालम, पूर्णा या ९ तालुक्यातील ३ लाख ९० हजार ७५८ शेतकऱ्यांच्या १ लाख ८१ हजार ७४२ हेक्टरवरील जिरायती पीकांचे ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले. त्यात सोयाबीन १ लाख १५ हजार २१० हेक्टर, कापूस ६२ हजार ९४ हेक्टर, उडिद ७०.६४ हेक्टर, ज्वारी ६४७ हेक्टर, मुग ७६.८४ हेक्टर, तूर २ हजार १ हेक्टर या पीकांचा समावेश आहे.

बाधितांच्या मदतीसाठी प्रतिहेक्टरी १३ हजार ६०० नुसार २४७ कोटी १६ लाख ९२ हजार २८८ रुपये निधीची मागणी जिल्हा प्रशासनाने केलेली आहे. परंतु त्यास मंजुरी नसल्यामुळे शेतकऱ्यांना प्रतिक्षा करावी लागणार आहे.

सप्टेंबर ऑक्टोबर अतिवृष्टिबाधित शेतकरी, क्षेत्र (हेक्टरमध्ये) मंजूर निधी (कोटी रुपये)

तालुका बाधित शेतकरी बाधित क्षेत्र निधी

परभणी ४२३१८ २७२७४ ३७.०९

सेलू ८६२६ ५४८२ ७.०८

पाथरी १०१४३ ७१६२ ९.७४

पूर्णा ३१८५० १६२५७ २२.१०

औंढा नागनाथ ५४८७६ १२३६० १६.८०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Garlic Rate : लसणाची आवक घटल्याने दर तेजीतच

Forest Fire : वणवे नियंत्रणासाठी जनजागृती करण्याची गरज

Sugarcane Labor Migration : निवडणूक संपताच ऊसतोड मजुरांचे स्थलांतर

Sugarcane FRP : मंडलिक साखर कारखाना इतरांच्या बरोबरीने दर देणार

Milk Rate : देशातील दूध उत्पादनात ४ टक्के वाढ; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT