Agriculture Electricity Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Electricity : कृषिपंप वीज सवलतीपोटी‘महावितरण’ला ९० कोटी

मागील अर्थसंकल्पात यासाठी २०० कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली होती. त्यापैकी सप्टेंबर २०२२ मध्ये ७० कोटी रुपये वितरित करण्यात आले होते.

Team Agrowon

Agriculture Pump Electricity मुंबई : आदिवासी विकास विभागाच्या (Tribal Development Department) आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत अनुसूचित जमातीच्या संबंधित कृषिपंपधारकांना (Agriculture Pump) दिलेल्या वीज सवलतीपोटी महावितरण (Mahavitaran) कंपनीस राज्य सरकारने ९० कोटी रुपये वितरित केले.

मागील अर्थसंकल्पात यासाठी २०० कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली होती. त्यापैकी सप्टेंबर २०२२ मध्ये ७० कोटी रुपये वितरित करण्यात आले होते. राज्यातील कृषिपंपधारकांना दरवर्षी सवलतीच्या दरात वीजपुरवठा करण्यात येतो.

त्याची प्रतिपूर्ती राज्य सरकार महावितरणला करत असते. या सवलत योजनेचा भाग असलेल्या आदिवासी विकास विभागाच्या आदिवासी विकास घटक कार्यक्रमांतर्गत अनुसूचित जमातींच्या कृषिपंपधारक आणि वैयक्तिक लाभार्थ्यांना वीज सवलत देण्यात येते.

आदिवासी विकास विभागाने २०० कोटी रुपयांची तरतूद केली होती. यापैकी महावितरणने दिलेल्या प्रस्तावानुसार ७० कोटी रुपयांचा निधी १९ सप्टेंबर, २०२२ रोजी वितरित केला आहे.

तर वित्त विभागाने ४५ टक्के म्हणजेच ९० कोटी रुपयांचा निधी महावितरणला वितरित केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT