Kolhapur Shetkari Sangh agrowon
ताज्या बातम्या

Kolhapur Shetkari Sangh : कुंपणच जेव्हा शेत खाते, शेतकरी संघाच्या व्यवस्थापकांनीच ८१ लाखांचा पाडला ढपला

Farmers Cooperative Sangh : कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी सहकारी सघांच्या चंदगड तालुक्यातील कार्वे शाखेत घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे.

Team Agrowon

Kolhapur Shetkari Sangh : कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी सहकारी सघांच्या चंदगड तालुक्यातील कार्वे शाखेत घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. या शाखेत असणाऱ्या साहित्यांची व उत्पादनांची विक्री होत होती. त्याची रितसर पावतीही केली जात होती, पण प्रत्यक्ष संघाच्या खात्यावर पैसे भरता परस्पर गायब केले जायचे.

दरम्यान याबाबत आक्षेप घेत अपहार झाल्याची तक्रार करण्यात आली होती. या शाखेचे लेखापरिक्षण केल्यानंतर कार्वे शाखेचे व्यवस्थापक शंकर इंगवले यांना बडतर्फ करण्यात आले आहे. रोखीचे साहित्य उधारीवर दाखवून संघात तब्बल ८१ लाख रुपयांचा अपहार झाल्याचे उघड झाले आहे.

यामध्ये इंगवले यांच्यासह इतर दोन अधिकाऱ्यांचीही चौकशी होत आहे. हा अपहार संगनमताने झाल्याचे उघड झाले आहे. मागच्या काही महिन्यांपूर्वी घोटाळा झाल्याची माहिती दैनिक सकाळने प्रसिद्ध केली होती. यावर जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे यांनी शासकीय लेखापरीक्षकांकडून विशेष लेखापरीक्षणाचे आदेश दिले.

त्याशिवाय, संघानेही अंतर्गत लेखापरीक्षण करून त्याचा अहवाल देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार संघाचे अशासकीय मंडळाचे अध्यक्ष सुरेश देसाई आणि इतर संचालकांनी संघात केलेल्या अंतर्गत लेखापरीक्षणात ८१ लाख रुपयांचा अपहार झाल्याचे सिद्ध झाले.

दरम्यान चौकशी सुरू झाल्यानंतर अपहारातील १४ ते १५ लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत. उर्वरित रक्कम वसूल व्हावी तसेच संबंधितावर कारवाई व्हावी, यासाठी शासकीय लेखापरीक्षणाच्या अहवालाची वाट पाहिली जात आहे. मात्र, जिल्हा उपनिबंधकांना दिलेल्या आदेशानुसार संघात केलेल्या अंतर्गत लेखापरीक्षणात मात्र अपहार झाल्याचे सिद्ध झाले आहे.

शाखा अधिकाऱ्यांसह लिपिकानेही चुकीची व्हाउचर काढल्याचे समोर आले आहे. याचबरोबर बोगस बिले, पैसे भरलेली पावती दाखवली आहे. पण प्रत्यक्ष खात्यावर पैसे भरलेले नाहीत. यामध्ये ४ ते ५ लाखांचा अपहार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. संघाचे व्यवस्थापक सचिन सरनोबत आणि निरीक्षक विठोबा इंगवले यांनी ही तपासणी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Portal : शेतकऱ्यांच्या तक्रारींसाठी स्वतंत्र पोर्टल उभारणार; कृषिमंत्री चौहान यांची घोषणा

Desi Poultry Farming : देशी कोंबडीपालनातून उद्योजकता विकास

Vegetable Farming : गौरीपूजनासाठीच्या वनस्पतींची शेती अन् सेवाही

Monsoon Animal Care: जनावरांना पावसाळ्यातील आजारांपासून वाचवण्यासाठी व्यवस्थापन पद्धती

Maratha Reservation : पोलिसांनी जरांगेंना दिली नोटीस; जरांगे म्हणाले, 'मेलो तरी मागे हटणार नाही'

SCROLL FOR NEXT