Sowing Agrowon
ताज्या बातम्या

Kharif Sowing : रावेर तालुक्यात ८० टक्के पेरण्या

Kharif Season 2023 : जुलैच्या पहिल्या आठवड्यात अतिवृष्टी व जोमदार पावसामुळे तालुक्यात खरिपाच्या ८०.२५ टक्के पेरण्या झाल्या आहेत.

Team Agrowon

Kharif Sowing : जुलैच्या पहिल्या आठवड्यात अतिवृष्टी व जोमदार पावसामुळे तालुक्यात खरिपाच्या ८०.२५ टक्के पेरण्या झाल्या आहेत. तालुक्यात दोन, तीन वेळा मुसळधार पाऊस झाल्याने बागायत कपाशीची वाढ जोमाने होत आहे.

तालुक्यात आतापर्यंत १६४ मिलिमीटर पाऊस झाला. तालुक्यातील सुकी, अभोरा, मंगरूळ हे प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.

यावर्षी पावसाअभावी खरीपाच्या पेरण्या उशिरा सुरू झाल्या. तालुक्यात ५ जुलैला अतिवृष्टी झाली. यानंतर खरीप पेरणीला शेतकऱ्यांनी सुरुवात केली. खरीप पिकांची उगवण ही चांगली झाली आहे. तर या पावसामुळे बागयती कपाशी तरारली आहे. केळी लागवडही जोमाने सुरू आहे.

तेवीस हजार हेक्टरवर पेरणी

तालुक्यात २९ हजार ४६७ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांच्या पेरणीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. आतापर्यंत २३ हजार ६४७ हेक्टर (८०.२५ टक्के) क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी झाली आहे.

पीकनिहाय पेरणी झालेले क्षेत्र (हेक्टर), कंसात उद्दिष्ट असे : ज्वारी -२०५९ (४९१५), मका -२३४७ (२४४४), कपाशी -१६,७९२ (१९२०४), तूर -६२६ (१२००), मूग -३४९ (७६३), उडिद -५१२ (१०४७), सोयाबीन -९०१ (७३०) तर केळी - १५ हजार ४०० हेक्टर जुनी केळी ६०६३. हळद मसाले पीक -१३१९ .

प्रमुख धरणे भरली

सातपुडा पर्वत भागात जुलैच्या पहिल्या आठवड्यात अतिवृष्टी व मुसळवार पाऊस झाला होता. या पावसामुळे तालुक्यातील सुकी, अभोरा, मंगरूळ ही धरणे शंभर टक्के भरली आहेत.

धरणांमधून पाणी ओसंडून वाहत असल्याने धरण परिसरातील नदी, नाले खळखळून वाहत आहेत. यामुळे भूजल पातळी वाढण्यास देखील मदत होणार आहे. यामुळे शेतकरी वर्गात सध्या समाधान व्यक्त होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Mechanical Paddy Transplanting: चिखलगावात यांत्रिक पद्धतीने भात लागवड

Onion Tomato Report: कांदा, टोमॅटोचा अहवाल १५ ऑगस्टपर्यंत सादर करा: पाशा पटेल समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT