Satara Dam Agrowon
ताज्या बातम्या

Satara Dam Water Storage : सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणांत ७५ टक्के पाणीसाठा

Satara Dam Water Level Rise : उरमोडी धरणाचा अपवाद वगळता कोयना, धोम,धोम-बलकवडी, कण्हेर, तारळी या प्रमुख धरणांत सरासरी ७५.४० टक्क्यांवर उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.

Team Agrowon

Satara News : जिल्ह्यातील प्रमुख धरण क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने पाण्याची आवक मोठी झाली आहे. उरमोडी धरणाचा अपवाद वगळता कोयना, धोम,धोम-बलकवडी, कण्हेर, तारळी या प्रमुख धरणांत सरासरी ७५.४० टक्क्यांवर उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. शुक्रवारी (ता. ४) मात्र धरण क्षेत्रातील पावसाचा जोर ओसरला आहे.

जुन व जुलै महिन्याच्या सुरुवातीस अपेक्षित पाऊस न झाल्याने धरणे भरणार की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसास सुरुवात झाली. जिल्ह्याच्या इतर भागात दमदार पाऊस नसलातरी प्रमुख धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने पाण्याची आवक होण्यास सुरुवात झाली.

उरमोडी धरणाचा अपवाद वगळता कोयना, धोम, धोम-बलकवडी, कण्हेर, तारळी या प्रमुख धरणांत ७० टक्क्यांवर उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. धरणे पूर्ण क्षेमतेने भरण्यासाठी अजूनही दमदार पावसाची गरज आहे. कोयना धरण क्षेत्रातही अपेक्षित पाऊस नसल्याने दरवाज्यातून पाणी सोडवे लागले नाही.

या धरणाच्या पायथा वीज गृहातून २१०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. सध्या कोयना धरण ७५.४९ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. धोम ९.४१, धोम-बलकवडी ३.४०, कण्हेर ७.००, उरमोडी ५.९० व तारळी धरणांत ५.०१ असा एकूण या सहा धरणांतील १०६.२१ उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. सहा धरणांतील पाण्याची टक्केवारी बघता ७५.४० टक्के इतका साठा झाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Vidhansabha 2024 Live Result : राज्यातील पहिला निकाल जाहीर; वडाळा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कोळंबकर विजयी

Satara Assembly Election 2024 : साताऱ्यातील जनतेचा महायुतीकडे कल, सर्वच मतदारसंघात भाजप महायुतीची आघाडी

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 : आदिती तटकरेंचा विजय निश्चित; कोकणातील पहिला निकाल स्पष्ट

Eknath Shinde On Maharashtra Assembly Election 2024 : लाडकी बहीण, लाडके भाऊ, लाडके शेतकरी यांच्यामुळे आमचा विजय, एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

Poultry Processing Product : अबब! कडकनाथच्या अंड्यांपासून एवढी उत्पादने?

SCROLL FOR NEXT