Crop Damage  Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : पीक नुकसानग्रस्तांकडून ७४ हजार दावे दाखल

Kharif Season : भरपाईची मागणी; साडेचार लाख हेक्टरला फटका

Team Agrowon

Kharif Sowing : नांदेड : जिल्ह्यात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिपातील साडेचार लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. नुकसानीबाबत पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना भरपाईसाठी पूर्वसूचना देण्याचे आवाहन करण्यात आले होते. यानुसार जिल्ह्यातील ७४ हजार १४७ शेतकऱ्यांनी दावे दाखल केल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्राने दिली.

जुलैमध्यें नांदेडमधील ८९ महसूल मंडळांपेकी तब्बल ८१ मंडळात एकापेक्षा अधिकवेळा अतिवृष्टी झाली. यात किनवट तालुक्यातील बोधडी व जलधारा मंडळात पाचवेळा अतिवृष्टीची नोंद झाली. तर इतर चार मंडळात चारवेळा अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमध्ये जिल्ह्यातील साडेचार लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. चार-पाच महिन्यांत पडणारा पाऊस काही तासांत पडून गेल्यामुळे नुकसान अधिक झाले.

अतिवृष्टी तसेच सततचा पाऊस यामुळे शेतीपिकांसह जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याबाबत जिल्हा प्रशासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ७२ तासांच्या आत भरपाईबाबत विमा कंपनीला पूर्वसूचना देण्याचे आवाहन करण्यात आले होते. यामुळे जिल्ह्यातील ७४ हजार १४७ शेतकऱ्यांनी पोर्टल तसेच ई-मेलव्दारे कंपनीकडे भरपाईसाठी दावे दाखल केले आहेत. दावे दाखल केलेल्या शेतकऱ्यांच्या क्षेत्राचे पंचनामे करण्याचे काम लवकरच होणार असल्याची माहिती पीक विमा कंपनीच्या सूत्राने दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

Ahilyanagar Karjmafi : अहिल्यानगरला तिसऱ्या टप्प्यात ८८ कोटी ८१ लाखांची कर्जमाफी

SCROLL FOR NEXT