Government Aid Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage Compensation : पुरंदर तालुक्यासाठी सात कोटींची मदत

मागील वर्षीच्या अतिवृष्टिग्रस्तांना लाभ

टीम ॲग्रोवन

सासवड : पुरंदर तालुक्यात गतवर्षी डिसेंबर २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) शेतकऱ्यांच्या पिकांचे (Crop Damage) आणि पशुधनाचे (Livestock) मोठे नुकसान झाले होते. त्याबाबत शासनाकडून ६ कोटी ७२ लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे,

अशी माहिती आमदार संजय जगताप यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. तर यंदाच्या अतिवृष्टीमुळे नुकसानीचे पंचनामे झाले आहेत. याचीही आर्थिक मदत लवकर मिळणार आहे, असे त्यांनी सांगितले.

गतवर्षी पुरंदर तालुक्यातील बहुतांश भागात अतिवृष्टीमुळे शेतातील उभ्या पिकांचे आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. साधारणतः ५ हजार हेक्टरवरील पिके आणि १५० हेक्टरवरील फळबागा नुकसानग्रस्त झाल्या होत्या.

तर ३२ शेतकऱ्यांची जनावरे दगावली. १३ हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. या बाबत पंचनामे करून शासनाकडून पिके आणि फळबागांसाठी ६ कोटी ६४ लाख ६८ हजार रुपयांची मदत दिली आहे.

तर अतिवृष्टी आणि कडाक्याच्या थंडीमुळे २०० पेक्षा अधिक मेंढ्या आणि इतर पशुधन दगावलेल्या ३२ शेतकऱ्यांना ७ लाख ४१ हजार रुपयांची मदत देण्यात येईल, असे जगताप यांनी नमूद केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT