Satara News : जुलै महिन्यात आले पिकास विक्रमी म्हणजे प्रतिगाडीस कमाल ६५ ते ७० हजार रुपये दर मिळाला होता. त्यानंतर ऑगस्टमध्ये आल्याच्या दरात घट झाली होती. या वेळी आल्याचे दर प्रति गाडीमागे पाच ते सात हजार रुपयांनी घट होऊन ते ५७ ते ६० हजार रुपयांवर आले होते. आले पिकाच्या दरात ऑगस्ट महिन्यात झालेल्या घसरणीनंतर सप्टेंबरमध्ये पुन्हा सुधारणा झाली आहे. आल्याच्या प्रतिगाडीस (५०० किलो) मालाच्या प्रतवारीनुसार कमाल ६५ हजार रुपयांपर्यंत दर मिळत आहे. आले पिकाच्या दरात सुधारणा झाल्याने उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
गेली चार वर्षे आले पिकाच्या दरात कायम घसरण होत होती. त्यामुळे आले उत्पादकांना सलग पाच ते सहा वर्षे मोठा आर्थिक फटका बसला. दराच्या घसरणीच्या कालावधीत शेतकरी चांगला नफा मिळेल या आशेने आले पिकासाठी लाखो रुपयांचा भांडवली खर्च करत होते. मात्र बाजारात योग्य दर मिळत नसल्याने आले पीक आतबट्ट्याचे ठरत होते.
परंतु जानेवारी महिन्यापासून आल्याच्या दरात सुधारणा होण्यास सुरुवात झाली. जानेवारीमध्ये प्रतिगाडी १५ ते १६ हजार रुपयांपर्यंत आल्यास दर मिळाला होता. त्यानंतर टप्प्याटप्प्याने दरात सुधारणा होत गेली. आले लागवडीसाठी आले बियाणे काढणी सुरू असताना, आले (धुणीच्या) दरात आणखी वाढ झाली होती. या काळात बियाण्याचे दर ३५ ते ३६ हजार रुपये प्रतिगाडीस मिळत होते.
आले दरात एप्रिल सुरू झाल्यापासून पुन्हा सुधारणा होण्यास सुरुवात झाली. जुलै महिन्यात आले पिकास विक्रमी म्हणजे प्रतिगाडीस कमाल ६५ ते ७० हजार रुपये दर मिळाला होता. त्यानंतर ऑगस्टमध्ये आल्याच्या दरात घट झाली होती. या वेळी आल्याचे दर प्रति गाडीमागे पाच ते सात हजार रुपयांनी घट होऊन ते ५७ ते ६० हजार रुपयांवर आले होते.
दरात घसरण होईल या भीतीने काही शेतकऱ्यांनी आले विक्री केली. मात्र दरातील घसरण कृत्रिम होती. सप्टेंबरच्या सुरुवातीपासून पुन्हा दरात सुधारणा झाली असून सध्या आल्यास प्रति गाडी कमाल ६५ हजार रुपयांपर्यंत दर मिळत आहे. पुढील दोन महिने तरी हा टिकून रहाण्याची शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
खोडवा आल्यास कमाल ६५ हजार रुपयांपर्यंत दर मिळत असल्याने नवीन लागवड केलेल्या आल्यास चांगला दर मिळत आहे. पावसाच्या दडीमुळे आल्यावर हुमणीचा प्रादुर्भाव वाढला आहे. मूळकुज नियंत्रणात येत नसल्याने काही शेतकरी आले काढून विक्री करत आहेत. या आल्यास ३५ ते ४५ हजार रुपये दर मिळत आहे. परिपक्व होण्याअगोदरच आले काढल्यामुळे उत्पादनात मोठी घट होत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.