Pune ZP Election Agrowon
ताज्या बातम्या

Pune ZP : नऊ वर्षांनी ६० हजार उमेदवारांना शुल्क परतावा

Pune ZP Recruitment : पुणे जिल्हा परिषदेने सन २०१४ मध्ये घोषित केलेल्या कर्मचारी भरतीसाठी सुमारे ६० हजार उमेदवारांनी अर्ज केले होते.

Team Agrowon

Pune News : पुणे जिल्हा परिषदेने सन २०१४ मध्ये घोषित केलेल्या कर्मचारी भरतीसाठी सुमारे ६० हजार उमेदवारांनी अर्ज केले होते. मात्र, भरती प्रक्रिया रद्द करण्यात आल्याने या अर्जापोटी घेण्यात आलेल्या प्रत्येकी ५०० आणि २५० रुपये शुल्काचे १ कोटी २८ लाख रुपये जिल्हा परिषदेकडे जमा आहेत. ते पैसे संबंधित उमेदवारांना तब्बल नऊ वर्षांनंतर परत केले जाणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या सूत्रांनी दिली.

मागील काळात सरळसेवा परीक्षांच्या जाहिराती आल्या. उमेदवारांनी परीक्षेसाठी अर्ज केले. परीक्षा शुल्क भरली, पण काही कारणास्तव परीक्षा रद्द झाल्या. मात्र शुल्क परत केले गेले नाही.

‘‘परीक्षा झाली नसेल, तर शासनाने विद्यार्थ्यांना शुल्काचे पैसे परत करणे आवश्यक आहे,’’ ही बाब आमदार रोहित पवार यांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या निदर्शनास आणून देत उमेदवारांना शुल्काची रक्कम त्वरित परत करावी, अशी मागणी केली होती.

तसेच, उमेदवारांकडूनही भरतीसाठी घेण्यात आलेल्या शुल्काचा परतावा केव्हा मिळणार, अशी विचारणा होत होती. त्यानंतर आता ग्रामविकास विभागाने हे अर्जाचे शुल्क परत करण्याचा निर्णय घेतला.

सन २०१४ मधील जिल्हा परिषद कर्मचारी भरती यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे म्हणाले, ‘‘सन २०१४ मधील उमेदवारांचे पैसे परत करण्यासाठी त्यांना मेसेज पाठविण्यात आला आहे. त्यांच्याकडून बँकेचा तपशील घेऊन ऑनलाइन पद्धतीने हे पैसे त्यांच्या खात्यावर जमा केले जातील.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shalinitai Patil Passes Away: माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचे निधन

Sugarcane Price: प्रतापगड कारखान्याचा प्रतिटन एकरकमी ३३५० रुपये दर

Wheat Rust Disease: गव्हावरील तांबेरा रोगाचे नियंत्रण करण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

Flood Relief: भूम तालुक्यात पूरग्रस्तांना ९० कोटींचे अनुदान वाटप

Loan Recovery Issue: कर्जमाफीची घोषणा; तरीही ऊसबिलातून वसुली सुरूच!

SCROLL FOR NEXT