Kolhapur ZP Agrowon
ताज्या बातम्या

Kolhapur ZP : कोल्हापूर जिल्हा परिषद सभेत ६० कोटींच्या कामांना मान्यता

जिल्‍ह्यात मोक्याच्या ठिकाणी जि.प.च्या मालकीच्या जागा आहेत. त्या विनावापर पडून आहेत. तेथे व्यावसायिक गाळे बांधणे, इमारतींसाठी वास्‍तुविशारद तथा तांत्रिक सल्‍लागार नेमण्यासाठी अटीशर्ती करण्यास सभेने मान्यता दिली.

Team Agrowon

कोल्‍हापूर : जिल्‍हा परिषदेच्या (Kolhapur ZP) सर्वसाधारण सभेत ६० कोटींच्या कामांना मान्यता देण्यात आली. सोमवारी (ता. ९) प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजय माने यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. यामध्ये बांधकाम विभागांतर्गत प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतील कामांची संख्या मोठी आहे. जिल्‍हा नियोजनच्या कामांबाबत (District Planning Work) प्रस्‍ताव सादर झाले असले तरी अद्याप त्यांना मंजुरी मिळालेली नाही.

सर्वसाधारण सभेसमोर ४५ विषय होते. यातील १५ विषय बांधकाम विभागाच्या मान्यतेसंदर्भात होते. या पाठोपाठ आरोग्य, ग्रामपंचायत, शिक्षण विभागांच्या कामांचा समावेश होता. कृषी विभागाच्या सेसमधून ५० टक्‍के अनुदानावर इलेक्ट्रिक मोटर इंजिनसाठी अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला.

याचबरोबर जिल्‍ह्यातील १६ प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील शवविच्‍छेदन रूमची दुरुस्‍ती व विस्‍तारीकरण करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. रोजगार हमीच्या सुधारित आराखड्यासही मान्यता देण्यात आली आहे. मागासवर्गीय वस्‍तीमध्ये पुन्‍हा एलईडी बसवण्याच्या कामास मंजुरी देण्यात आली आहे.

जिल्‍ह्यात मोक्याच्या ठिकाणी जि.प.च्या मालकीच्या जागा आहेत. त्या विनावापर पडून आहेत. तेथे व्यावसायिक गाळे बांधणे, इमारतींसाठी वास्‍तुविशारद तथा तांत्रिक सल्‍लागार नेमण्यासाठी अटीशर्ती करण्यास सभेने मान्यता दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Rust: उसातील तांबेरा रोगाचे कारण, लक्षणे आणि उपाय

Farm Loan Waiver: 'त्या' ६ ते ७ लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा, अतिरिक्त व्याज हटवले

Agrowon Podcast: मका दरात किंचीत वाढ, मुग दरात चढ-उतार, टोमॅटोच्या आवकेत घट, शेपूचे दर टिकून तर संत्री दरात नरमाई

Sangli Water Shortage: सांगली जिल्ह्यात २३ टँकरद्वारे ४३ हजार ६८७ ग्रामस्थांना पाणी

Maharashtra Weather : मराठवाडा, विदर्भात पावसाचा जोर वाढणार; पाच दिवस कोणत्या भागात पाऊस?

SCROLL FOR NEXT