Pune Dam Agrowon
ताज्या बातम्या

Pune Rain Update : धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस ; धरणांत ५१ टीएमसी पाणीसाठा

Latest Rain Update Pune : धरणक्षेत्रात आणि घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे ओढे, नाले ओसंडून वाहत असल्याने धरणांतील पाणी पातळीत वेगाने वाढ होत आहे.

Team Agrowon

Pune News : धरणक्षेत्रात आणि घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे ओढे, नाले ओसंडून वाहत असल्याने धरणांतील पाणी पातळीत वेगाने वाढ होत आहे. एकूण २६ धरणांत ५१.२० टीएमसी एवढा पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न काही प्रमाणात सुटण्यास मदत झाली आहे.

गेल्या चार ते पाच दिवसांपासून पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे. पूर्व भागातही बऱ्यापैकी पाऊस पडल्याने खरिपातील पिकांना आधार मिळाला आहे. परंतु पश्‍चिमेकडील धरणक्षेत्रात पावसाचा प्रभाव कायम आहे. त्यामुळे भात खाचरे तुडुंब भरली असून, आता धरणांतील पाण्यामध्ये मोठी आवक सुरू झाली आहे. मंगळवारपासून (ता. १८) धरणांत आवक वाढू लागली आहे.

गेल्या चार दिवसांत २२.२९ टीएमसी एवढ्या पाण्याची आवक झाली असून, मागील दोन दिवसांत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे. शुक्रवारी (ता.२१) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये ६.९० टीएमसी एवढ्या पाण्याची आवक झाली आहे. अजूनही धरणक्षेत्रात पाऊस सुरू असल्याने पाण्याची चांगली आवक होण्याची शक्यता आहे.

सध्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर काही प्रमाणात कमी झाला आहे. लोणावळा घाटमाथ्यावर ८३ मिलिमीटर पाऊस पडला. तर कुंडली ६६ मिलिमीटर, शिरोटा ५०, मुळशी ४७, वळवण ४४ मिलिमीटर पाऊस पडला असून, ठोकरवाडीच्या घाटमाथ्यावर अवघा २० मिलिमीटर पाऊस पडला. त्यामुळे मुळशी, आंध्रा, वळवण, शिरवटा, लोणावळा या धरणांत पाण्याची आवक कमी होऊन १.२१ टीएमसी एवढ्या पाण्याची आवक झाली आहे.

मुठा खोऱ्यातील टेमघर, वरसगाव, पनाशेत या धरणक्षेत्रांत पावसाचा जोर कमी झाला असून, खडकवासला धरणक्षेत्रात तुरळक सरी बरसल्या आहेत. त्यामुळे या धरणांत १.१८ टीएमसी एवढ्या पाण्याची आवक झाली आहे. यामध्ये खडकवासला धरण वगळता इतर धरणांतील पाणीसाठा ५० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.

नीरा खोऱ्यातील पवना, कळमोडी, गुंजवणी, नीरा देवघर या धरणक्षेत्रांत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. तर कासारसाई, भामा आसखेड, आंध्रा, नाझरे, भाटघर, वीर या धरणक्षेत्रांत तुरळक सरी पडल्या असून, शेटफळ, चासकमान, वडिवळे धरणक्षेत्रांत पावसाची उघडीप होती. त्यामुळे या धरणांत २.१३ टीएमसी एवढ्या पाण्याची आवक झाली आहे. कळमोडी शंभर टक्के, तर वडिवळे ७७ टक्क्यांपर्यंत भरले आहे.

तर पवना, कासारसाई, चासकमान, भामा आसखेड, आंध्रा, गुंजवणी, भाटघर, नीरा देवघर ही धरणे ४० ते ५५ टक्क्यांच्या दरम्यान भरली आहेत. तर वीर, नाझरे, शेटफळ या धरण्यांत अजूनही पुरेसा पाणीसाठा झालेला नाही. कुकडी खोऱ्यातील धरणांत हलक्या सरी पडल्या असून, या भागात धरणांत १.३७ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. यामध्ये चिल्हेवाडी धरणांत ७७ टक्के, तर वडज धरणांत ४७ टक्के, तर माणिकडोह, येडगाव या धरणांत पाणीसाठा कमी आहे. पिंपळगाव जोगे, घोड आणि विसापूर, उजनी या धरणांत अजूनही उपलब्ध पाण्याचा साठा झालेला नाही.

शुक्रवारी (ता.२१) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये धरणनिहाय पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)

पवना ४०, टेमघर ३०, वरसगाव २४, पानशेत २७, खडकवासला २, कासारसाई ४, कळमोडी २४, भामा आसखेड ५, आंध्रा १२, नाझरे १, गुंजवणी ५०, भाटघर ५, नीरा देवघर ३६, वीर २, पिंपळगाव जोगे १४, माणिकडोह १०, येडगाव ३, वडज ८, डिंभे ८, चिल्हेवाडी ५, घोड ५, उजनी २, मुळशी ४७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT