Eknath Shinde Agrowon
ताज्या बातम्या

Eknath Shinde : ‘संत काशिबा’साठी ५० कोटी देणार

मुख्यमंत्री शिंदे ः सोलापुरातील गुरव समाजाच्या महाअधिवेशनात घोषणा

Radhika Mhetre

सोलापूर : ‘‘गुरव समाज हा देव, देश, धर्म, सामाजिक बांधिलकी जोपासणारा, निसर्गपूजक आहे. त्यामुळे गुरव बांधवांचे समाजातील स्थान महत्त्वाचे आणि आदराचे आहे. गुरव समाजाच्या विकासासाठी संत काशिबा युवा विकास महामंडळ योजना सुरू करण्यात येईल. तसेच या योजनेसाठी ५० कोटी रुपयांचा निधीही देण्यात येईल,’’ अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी (ता.११) येथे केली.

राष्ट्रीय गुरव समाज महासंघाच्या वतीने आयोजित गुरव समाजाच्या महाअधिवेशनाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, सहकारमंत्री अतुल सावे, खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, समाधान आवताडे, शहाजी पाटील, यशवंत माने, राणाजगजितसिंग पाटील, राजेंद्र राऊत, राष्ट्रीय गुरव समाज महासंघाचे अध्यक्ष विजयराज शिंदे, डॉ. नितीन ढेपे, डॉ. मल्लिकार्जुन गुरव आदी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, ‘‘गुरव समाज अल्पसंख्य असला, तरी दुधातील साखरेसारखे काम करतो. मंदिरे, पूजास्थळे समाज परिवर्तन करण्याचे साधन आहे. संस्कार रुजविण्याचे काम या ठिकाणी होते. वारकरी समाजाची मोठी परंपरा सांगणारा व हिंदू समाजाला जीवित ठेवण्याचे काम गुरव समाज करतो.’’

‘पंढरपूर कॉरिडॅारबाबत अफवा नको’

‘‘सोलापूर ही आध्यात्मिक नगरी आहे. श्रद्धेचा जिल्हा आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंढरपूरचा विकास सुरु केला आहे. पंढरपूर कॉरिडॅार हा कोणालाही उद्‌ध्वस्त करणारा नाही. परंपरा, मंदिरांना सुरक्षित ठेवू. वारकऱ्यांना, भक्तांना उत्तम सुविधा देणारा आहे. या कॉरिडॅारबाबत चुकीच्या अफवा पसरविल्या जात आहेत, यावर कोणीही विश्वास ठेवू नये,’’ असे आवाहन फडणवीस यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT