Kisan Long March Agrowon
ताज्या बातम्या

Kisan Long March : आंदोलक शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू ; सरकारकडून ५ लाखांच्या मदतीची घोषणा

लाँग मार्च दरम्यान अस्वस्थ वाटू लागल्याने या शेतकऱ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या शेतकऱ्यावर शहापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान या शेतकऱ्याचा मृत्यू झाला.

Team Agrowon

Kisan Long March नाशिकहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या शेतकरी लाँग (Farmer Long March) मार्चमध्ये पायी चालणाऱ्या एका शेतकऱ्याचा मुत्यू (Farmer Died In Long March) झाला आहे. पुंडलिक अंबादास जाधव असे मृत शेतकऱ्याचे नाव असून त्यांचे वय ५८ वर्षे होते. (Latest Agriculture News)

जाधव हे नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील माहुडी गावाचे रहिवासी होते. या घटनेनंतर मृत शेतकऱ्याच्या कुटुंबियांना ५ लाखांच्या मदत करणार असल्याची माहिती नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे.

लाँग मार्च दरम्यान अस्वस्थ वाटू लागल्याने या शेतकऱ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या शेतकऱ्यावर शहापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान या शेतकऱ्याचा मृत्यू झाला.

मंत्री दादा भुसे यांनी या शेतकऱ्याच्या दुर्दैवी मृत्युवर शोक व्यक्त केला आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या शेतकऱ्याच्या तृत्यूवर दु:ख व्यक्त करत कुटुंबियांना ५ लाख रुपयांची मदत करण्याची घोषणा केली असल्याची माहिती भुसे यांनी दिली.

दरम्यान, किसान सभेच्या बारा जणांच्या शिष्टमंडळाची गुरूवारी (ता. १६) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बैठक झाली. या बैठकीत शेतकऱ्यांच्या काही मागण्या मान्य करण्यात आल्या.

तर काही मागण्यांसदर्भात एक समितीही गठित करण्यात येणार आहे. दरम्यान, शुक्रवारी (ता. १७) मुख्यमंत्री शिंदे यांनी शेकऱ्यांच्या मागण्यांसदर्भात विधानसभेत निवेदन दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Manikrao Kokate Resigns: अखेर कोकाटेंना मंत्रीपद सोडावं लागलं, त्यांचा राजीनामा अजित पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे पाठवला

Sugarcane Price: दीड महिन्यानंतरही १२ साखर कारखान्यांकडून ऊसदर नाहीच

Mahavistar AI App: ‘महाविस्तार एआय’कडे शेतकऱ्यांचा कल

Land Records: मंडलस्तरावर दर मंगळवारी होणार फेरफार अदालत

Sugarcane Payment Delay: शेतकऱ्यांची बिले थकवली, 'काटामारी'चाही गंभीर प्रश्न, राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT