Rabi Seed Agrowon
ताज्या बातम्या

Rabi Seed Production : रब्बीसाठी बीजोत्पादन योजनेचा ४५ कोटींचा वार्षिक आराखडा

रब्बी हंगामासाठी ग्रामबीजोत्पादन योजनेच्या सादर केलेल्या ४५ कोटी ८६ लाख रुपयांच्या वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

टीम ॲग्रोवन

मुंबई : रब्बी हंगामासाठी (Rabi Season) ग्रामबीजोत्पादन योजनेच्या (Seed Production Scheme) सादर केलेल्या ४५ कोटी ८६ लाख रुपयांच्या वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

या योजनेअंतर्गत बियाणे तपासणी प्रयोगशाळा सुधारणे, बियाणे उत्पादन संस्थांना नवीन बियाणे उत्पादन तंत्रज्ञान आत्मसात करण्यास साह्य करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येते. या अभियानांतर्गत शेतकऱ्यांना वाजवी दरामध्ये व ठरावीक वेळेत दर्जेदार बियाण्यांची उपलब्धता होण्यास मदत होणार आहे.

या पार्श्‍वभूमीवर २०२२-२३ वर्षासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला. या आराखड्यानुसार अभियान कक्षेतील शेतकऱ्यांना प्रमाणित बियाणे पुरवठा करण्यासाठी केंद्रीय बियाणे उत्पादन करण्यापासून बियाणे क्षेत्राच्या विकासासाठी हितावह पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी साहाय्य करणे, नैसर्गिक आपत्तीवेळी बियाणांची गरज भागविण्यासाठी बियाणे बँकेत जमा करणे अशी साखळी तयार करण्याची तरतूद आहे.

बीजग्राम कार्यक्रम, तालुका बीजगुणन प्रक्षेत्राचे बळकटीकरण, प्रमाणित बियाणे उत्पादनास सहायक करण्याच्या बाबींचाही यात समावेश आहे. कृषी आयुक्तालयाने केंद्र सरकारला हा आराखडा मे, २०२२ मध्ये सादर केला होता. त्यास सात ऑक्टोबर रोजी मान्यता देण्यात आली आहे.

त्यानुसार केंद्र सरकारचा २७ कोटी ५१ लाख ६० हजार रुपये तर राज्य सरकारचा १८ कोटी ३४ लाख ४० हजार रुपयांचा हिस्सा आहे. यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी २३ कोटी ८४ लाख ७२ हजार, अनुसूचित जातींसाठी १४ कोटी २१ लाख, ६६ हजार, अनुसूचित जमातीसाठी ७ कोटी ७९ लाख ६२ हजार रुपयांचा निधी २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी मंजूर करण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pre Monsoon Rain: राज्यात ३ दिवस पावसाचा अंदाज; सोमवारी आणि मंगळवारी अनेक भागात पावसाचा अंदाज 

Chana Threshing: खानदेशात हरभरा मळणी पूर्णत्वाकडे

Reservoir Levels Drop: सातपुड्यातील सिंचन प्रकल्पांत जलसाठा घटला

Sprouted Grains: मोड आलेल्या कडधान्यांपासून पौष्टिक पदार्थ

Unseasonal Rain: अवकाळी, गारपिटीचे शेतकऱ्यांवर संकट, पीक नुकसानीचे तातडीने मुल्यांकन करण्याचे केंद्रीय कृषिमंत्र्यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT