Bribe News
Bribe News  Agrowon
ताज्या बातम्या

Arrest In Bribe : कुंपणच खातंय शेत

Team Agrowon

Bribe News : राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) चालू वर्षी १ जानेवारी ते २५ एप्रिलदरम्यान २८३ सापळे लावले. त्यामध्ये तब्बल राज्यातील ४०३ शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना अटक (Arrest In Bribe) केली आहे.

विशेष म्हणजे, लाचखोरी प्रकरणात महसूल- भूमी अभिलेख व नोंदणी विभाग अव्वल आहे. त्या पाठोपाठ पोलिस विभागाचा क्रमांक आहे. त्यामुळे ‘कुंपणच खातंय शेत’ अशी स्थिती लाचलुचपत विभागाने दिलेल्या माहितीतून समोर आली आहे.

लाचखोरीविरुद्धच्या कारवाईत पुणे परिक्षेत्र राज्यात द्वितीय क्रमांकावर असल्याचेही समोर आले आहे. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही माहिती दिली आहे.

एकीकडे लाखोंचे वेतन, विविध भत्ते, सर्व शासकीय सुविधा घेत असतानाही हे सरकारी कर्मचारी लाचखोरीने प्रशासनाची अब्रू घालवत आहेत, अशीच स्थिती आहे.

गरिबांची किरकोळ कामे अडवून चिरीमिरी मागणारे हे शासकीय कर्मचारी अलगद जाळ्यात अडकत आहेत. वर्षनिहाय त्यांची संख्याही वाढत आहे.

नाशिक परिक्षेत्रात लाचलुचपत विभागाने लावलेले सर्वाधिक ५६ सापळे यशस्वी झाले आहेत. त्यात ८७ संशयितांना अटक करण्यात आली. त्यापाठोपाठ पुणे क्षेत्रात ५३ सापळ्यांत ७५ आरोपींना गजाआड करण्यात आले.

तर सर्वाधिक कमी १४ सापळे मुंबई विभागात लावले गेले. तेथून १६ जणांना अटक झाली. विशेष म्हणजे मुंबईत अपसंपदेचे चार गुन्हे दाखल असून, सहा आरोपींना अटक झाली. तसेच अन्य भ्रष्टाचारप्रकरणी एक गुन्हा दाखल आहे.

थोडक्यात महत्त्वाचे...

- ‘लाचलुचपत’ने साडेतीन महिन्यांत लावले २८३ सापळे

- लाचखोरीत महसूल- भूमी अभिलेख व नोंदणी विभाग अव्वल

- वर्षनिहाय लाचखोर कर्मचाऱ्यांची संख्या वाढतीच

लाचखोरीतील अव्वल विभाग

विभाग---एकूण प्रकरणे--पकडलेले आरोपी

महसूल---७१---१००

पोलिस---५०---७५

पंचायत समिती---३०---४१

महावितरण---१७---२३

जिल्हा परिषद---११---१४

विभागनिहाय लाचखोरीची प्रकरणे :

विभाग---गुन्हे---आरोपी

मुंबई---१४---१६

ठाणे---३६---५१

पुणे---५३---७५

नाशिक---५६---८७

नागपूर---३२---५०

अमरावती---२२---३२

औरंगाबाद---४९---६८

नांदेड---२०---२४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Katol APMC : उच्च न्यायालयाची पणनमंत्र्यांना नोटीस

Pesticide Use : कीडनाशकांच्या अतिवापराविषयी सर्वोच्च न्यायालयात याचिका

Crate Production : अमरावती जिल्हा झाला क्रेट उत्पादनाचे हब

Crop Damage : श्रीरामपूर, कोपरगाव तालुक्यांना वादळी पावसाचा तडाखा

Small Land Holders : राज्यात वाढला अत्यल्प भूधारकांचा टक्‍का

SCROLL FOR NEXT