Milk Agrowon
ताज्या बातम्या

Dairy Farming : विदर्भात दुग्धव्यवसायाच्या प्रसारासाठी ४०० कोटींचा कार्यक्रम

Milk Production : त्यामुळे विदर्भातील ११ जिल्ह्यांत दुग्धव्यवसाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी ४०० कोटी रुपयांचा कार्यक्रम हाती घेतला आहे,’’ अशी माहिती पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले.

Team Agrowon

Pune News : ‘‘समाजामध्ये देशी गोवंशाचे दिवसेंदिवस महत्त्व वाढत नागरिकांनी त्यांचे संवर्धन करण्यास सुरुवात केली आहे. देशी गोवंशाच्या वाणांचे संवर्धन प्रचार व प्रसार करण्याची फार मोठी संधी आहे. गोसेवा आयोगाने या क्षेत्रात भरीव काम करावे. आयोगाला सर्व मदत शासनाकडून केली जाईल.

तसेच विदर्भातील ११ जिल्ह्यांत दर दिवसाला केवळ १० लाख लिटर उत्पादन होते. त्यामुळे विदर्भातील ११ जिल्ह्यांत दुग्धव्यवसाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी ४०० कोटी रुपयांचा कार्यक्रम हाती घेतला आहे,’’ अशी माहिती पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले.

पशुसंवर्धन आयुक्तालयात महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी शनिवारी (ता.२) मंत्री विखे-पाटील बोलत होते. या वेळी आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, पशुसंवर्धन आयुक्त हेमंत वसेकर, सहआयुक्त शीतलकुमार मुकणे, आयोगाचे सदस्य सुनील सूर्यवंशी, संजय भोसले, डॉ. नितीन मार्कंडेय आणि उद्धव नेरकर उपस्थित होते.

‘‘राज्यात गोसेवा आयोगाच्या सदस्यांना आवश्यक ती मदत पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात येईल,’’ असे विखे म्हणाले.

मुंदडा म्हणाले,‘‘देशात आजपर्यंत सहा राज्यात गोसेवा आयोगाची स्थापना केली आहे. समाजात देशी गोवंश संवर्धन करणाऱ्या विविध सामाजिक संस्था कार्यरत आहेत. या संस्थेला सोबत घेऊन या आयोगाचे नाव देश पातळीवर नेण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

महाराष्ट्र गोहत्याबंदी कायद्याची अंमलबजावणी आयोगातर्फे करण्यात येईल. राज्यात आतापर्यंत ५० गोरक्षकांनी प्राण गमावले आहेत. त्यांच्या कुटुंबाला प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत करू.’’

‘आयोगाला सामाजिक दायित्व निधी देणार’

महाराष्ट्र गोसेवा आयोगाला सामाजिक उत्तरदायित्व निधीतून मदत करणार असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. पाटील यांनी आयोगाच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी ते बोलत होते.

‘‘आयोगाच्या माध्यमातून देशी गाईचे संगोपन, संवर्धन, संरक्षण, गोशाळा तसेच दूध, गोमूत्र आणि शेणापासून विविध उत्पादन करण्यात येईल. गोमूत्र आणि पर्यावरणासाठी शेणाचे महत्त्व वाढले आहे. त्यामुळे आगामी काळात जागतिक पातळीवरील मागणी लक्षात घेता त्यादृष्टीने उत्पादन केल्यास निश्चित फायदा होईल.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT