Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage Compensation : सांगलीत नुकसानग्रस्तांच्या खात्यावर ३५ कोटी वर्ग

गेल्या वर्षी डिसेंबर २०२१ मध्ये अतिवृष्टी, परतीचा पाऊस आणि मॉन्सूनोत्तर पाऊस यामुळे जिल्ह्यातील द्राक्ष, पिकासह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले होते.

टीम ॲग्रोवन

सांगली ः गेल्या वर्षी डिसेंबर २०२१ मध्ये अतिवृष्टी (Heavy Rain), परतीचा पाऊस आणि मॉन्सूनोत्तर पाऊस (Post Monsoon Rain) यामुळे जिल्ह्यातील द्राक्ष, पिकासह अन्य पिकांचे मोठे नुकसान (Crop Damage) झाले होते. त्याचे पंचमाने पूर्ण करून त्याचा अहवाल संबंधित विभागाकडे वर्ग करण्यात आला होता.

या पावसामुळे जिल्ह्यातील ३९ हजार ७४५ शेतकऱ्यांची पिके बाधित झाली होती. या पिकांच्या नुकसान भरपाईपोटी मदत सप्टेंबर महिन्यात जिल्हा प्रशासनानकडे आली असून ऑक्टोबरपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर ३५ कोटी २१ लाख २० हजार वर्ग करण्यात आले.

जिल्ह्यात डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मॉन्सूनोत्तर पावसामुळे शेतकरी पुरता हतबल झाला होता. या दरम्यान, ३८४ गावांतील पिके बाधित झाली होती. सुमारे २१ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. तत्कालीन पालकमंत्री जयंत पाटील आणि कृषी राज्य मंत्री विश्वजित कदम यांनी बाधित पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते.

तालुकानिहाय गतवर्षी पीक नुकसानीपोटी मदत (रुपयांमध्ये)

तालुका प्राप्त निधी शेतकऱ्यांना वाटप निधी

मिरज ९ कोटी ५८ लाख ९ कोटी ३ लाख ७५ हजार

अप्पर सांगली ३ लाख ३० हजार ७ २ लाख ६७ हजार ३

तासगाव १३ कोटी १९ लाख ३८ हजार १२ कोटी ५७ लाख ७१ हजार

वाळवा २ लाख २ हजार ५७ २ लाख २३ हजार

अप्पर आष्टा ३ लाख ९० हजार ४ ३ लाख ९० हजार

शिराळा ५५ हजार ५५ हजार

पलूस ३ कोटी ३५ लाख ४ हजार ३ कोटी १२ लाख ९७ हजार

कडेगाव १ लाख ९० हजार ७५ १ लाख ९० हजार ७५

विटा ३ लाख ३० हजार ५६ ३ लाख ३० हजार ५६

आटपाडी ६ लाख ६० हजार ५ ६ लाख ३० हजार २५

कवठे महांकाळ २ कोटी ८३ लाख ८ हजार २ कोटी ७० लाख ९४ हजार

जत २ कोटी ३३ लाख ७१ हजार १ कोटी ६५ लाख ५ हजार

अप्पर संख ४ कोटी ५६ लाख ८२ हजार ४ कोटी ७ हजार ४१

एकूण ३८ कोटी १ लाख ७ हजार ३५ कोटी २१ लाख २० हजार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bajara Farming: बाजरीची पेरणी आणि खत व्यवस्थापन; चांगल्या उत्पादनासाठी महत्त्वाच्या गोष्टी

RBI MPC Meeting 2026: कर्जाचा हप्ता वाढणार नाही, पण कमी पावसामुळे महागाई वाढणार- आरबीआय गर्व्हनर

Modern Sowing Machines: पेरणीकरिता आधुनिक यंत्रांचा वापर

Crop Impact Management: विदर्भातील पर्जन्यमान अन् पिकांवरील परिणाम

Kharif Crop Planning: खरिपाच्या पूर्वतयारीसाठी हे मुद्दे नका विसरू

SCROLL FOR NEXT