ST Recruitment  Agrowon
ताज्या बातम्या

ST Recruitment : सोलापुरात ‘एसटी’मध्ये ३३६ तरुणांना नियुक्त्या

प्रशिक्षणानंतरही सोलापूर विभागातील युवकांना तीन वेळा मेडिकल चाचणी द्यावी लागली होती.

Team Agrowon

Solapur ST News : राज्य सरकारने राज्य परिवहन महामंडळातील २०१९ पासून प्रलंबित असलेल्या ३३६ एसटी कर्मचाऱ्यांना एकाच महिन्यात नियुक्त्या दिल्या असून, हा निर्णय घेऊन सरकारने या तरुणांना दिलासा दिला आहे. एसटी महामंडळात २०१९ पासून कर्मचारी भरतीची प्रक्रिया रेंगाळली होती.

प्रशिक्षणानंतरही सोलापूर विभागातील युवकांना तीन वेळा मेडिकल चाचणी द्यावी लागली होती. या प्रश्नावर सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते, तर माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनीही या कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांचा प्रश्‍न लावून धरला होता.

त्यामुळे मराठा समाजासह इतर सर्वच समाजातील ३३६ जणांना चार टप्प्यांत नियुक्त्या मिळाल्या आहेत.

चालक, वाहक दोन्हीही भूमिका बजावणार

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने काळाची गरज ओळखून, एसटीच्या कर्मचाऱ्यांना मल्टिटास्क ट्रेनिंग दिलेय.

त्यामुळे नव्याने नियुक्त झालेले हे सर्व ३३६ कर्मचारी चालक आणि वाहक अशा दोन्ही भूमिका पार पाडणार आहेत. त्यामुळे एसटीची कार्यक्षमता वाढणार असून उत्पन्नवाढीलाही चालना मिळणार आहे, असे सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Update: माॅन्सून गोव्यात दाखल; माॅन्सूनच्या पुढील वाटचालीसाठी पोषक हवामान

Agriculture Workshop: सघन कापूस लागवडीवर केळीवेळी येथे मार्गदर्शन

Jalyukt Shivar Abhiyan: 'एल निनो'चं संकट; 'जलयुक्त शिवार'साठी १७० कोटी निधी, प्रत्येक जिल्ह्याला मिळणार ५ कोटी

Fertilizer Shop License Suspension: अकोला जिल्ह्यात सात कृषी सेवा केंद्रांचे परवाने रद्द

Fertilizer Complaints Helpline: खतविषयक तक्रार निवारणासाठी तालुकानिहाय हेल्पलाइन सुविधा

SCROLL FOR NEXT