Polyhouse Farming Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Fraud News : किनवटच्या शेतकऱ्यांना ३३ लाखांचा गंडा

शेतकऱ्यांना पोकरा व एकात्मिक फलोत्पादन अभियानातून पॉलिहाउस, शेडनेट यांसह इतर योजनांचा लाभ घेण्यासाठी ‘महाडीबीटी’ पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

Team Agrowon

Agriculture Fraud News नांदेड : कृषी विभागाच्या (Agriculture Department) ‘पोकरा’ (POCRA) व एकात्मिक फलोत्पादन अभियान या शासकीय योजनेतून पॉलिहाउस (Playhouse) व शेडनेट देण्याच्या नावाखाली रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणच्या दोघांनी किनवट तालुक्यातील १० शेतकऱ्यांना (Fraud With Farmer) तब्बल ३३ लाख ९० हजार रुपयांना फसविले आहे.

कोकणातील रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण येथील श्रद्धा अमोल निघोट व अमोल मोरेश्‍वर निघोट हे १४ फेब्रुवारी रोजी किनवट येथे आले. येथील एका लॉजवर त्यांनी शेतकरी राजेश हनमनलू बोलेनवार व इतर नऊ शेतकऱ्यांची बैठक घेतली.

यात त्यांनी राज्य शासनाच्या पोकरा व एकात्मिक फलोत्पादन अभियानातून किनवट शिवारात पॉलिहाउस व शेडनेट देण्याचे आश्‍वासन दिले.

या योजनेतील अनुदान मंजुरीसाठी त्यांनी बोलेनवार व इतर शेतकऱ्यांना ठेव म्हणून रकमेची मागणी केली. श्रद्धा निघोट या महिलेने तिच्या चिपळूण येथील आयडीबीआय बँकेत रक्कम जमा करण्याचे सांगितले.

यावर शेतकऱ्यांनी विश्‍वास ठेवून बोलेनवार व इतरांनी श्रद्धा निघोटच्या खात्यावर तब्बल ३२ लाख ९० हजार रुपये आरटीजीएसद्वारे जमा केले.

रक्कम पोहोचल्यानंतर या दोघांची कोणताही प्रतिसाद दिला नाही. वारंवार संपर्क करूनही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना फसवणूक झाल्याचे कळाले. या प्रकरणी राजेश बोलेनवार यांनी किनवट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल करून किनवट पोलिस तपास करीत आहेत.

ऑनलाइन अर्जाची सुविधा

शेतकऱ्यांना पोकरा व एकात्मिक फलोत्पादन अभियानातून पॉलिहाउस, शेडनेट यांसह इतर योजनांचा लाभ घेण्यासाठी ‘महाडीबीटी’ पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

या पोर्टलवरून निविष्ठा खरेदी, अनुदान मागणी अशा सुविधा शेतकऱ्यांना मिळतात. तरीही शेतकरी खोट्या आश्‍वासनाच्या मागे लागून स्व:तची फसवणूक करून घेत असल्याची या प्रकारावरून सिद्ध होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Flight Tickets Prices : सोलापूरहून मुंबई, गोवा विमान प्रवासाचे तिकीट दर जाहीर

Ballot Paper Petition : ‘बॅलेट पेपर’बाबतची याचिका फेटाळली

Mango Production : सातपुड्यात आंब्यांच्या चांगल्या उत्पादनाची अपेक्षा

Maharashtra Politics : फडणवीस यांच्या नावाची घोषणा लांबल्याने समर्थकांत अस्वस्थता

Co-Generation Subsidy : सात कारखान्यांच्या सहवीज प्रकल्पांना अनुदान नाकारले

SCROLL FOR NEXT