Crop Insurance Agrowon
ताज्या बातम्या

Crop Insurance : पीकविम्याची २५ टक्के आगाऊ रक्कम सर्वांनाच द्या

सर्वच महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पीकविम्याची २५ टक्के आगाऊ रक्कम दिली जावी, अशी मागणी भारत कृषक समाजाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

टीम ॲग्रोवन

अकोला ः सर्वच महसूल मंडळातील (Revenue Department) शेतकऱ्यांना पीकविम्याची (Crop Insurance) (२५ टक्के आगाऊ रक्कम दिली जावी, अशी मागणी भारत कृषक समाजाने जिल्हाधिकाऱ्यांकडे (Collector Office Jalgaon) केली आहे. अकोल्यात काही महसूल मंडळांत नुकसान लक्षात घेता २५ टक्के आगाऊ रकमेबाबत आदेश काढण्यात आले.

त्यानंतर कृषक समाजाने ही मागणी केली. निवेदनात म्हटले, की शासनाकडून चुकीचे सर्वे करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम सुरू आहे. काही ठरावीक महसूल मंडळालाच पीकविम्याची आगाऊ २५ टक्के रक्कम देण्याची शिफारस केली आहे.

प्रशासनाने लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदत जमा करावी, अशी मागणी चेअरमन डॉ. प्रकाश मानकर, शेषराव पाटील चिखलीकर, राजकुमार भट्टड, माणिकराव गावंडे, वासुदेव गावंडे, गोपाल पोहरे, विलास वरोकार, ज्ञानेश्‍वर आवारे आदींनी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT