VNMKV Research Agrowon
ताज्या बातम्या

VNMKV Research : ‘वनामकृवि’स संशोधनासाठी २५ कोटींचा निधी मंजूर

मराठवाड्यात ५ ठिकाणी ८ अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारणार

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
Parbhani : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (वनामकृवि) (VNMKV) अंतर्गत ८ संशोधन (प्रयोगशाळा) प्रकल्पांसाठी २५ कोटी रुपये निधीस प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे.

यातून मराठवाड्यात ५ ठिकाणी ८ अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे. त्यासंबंधी शासन निर्णय राज्य शासनाने शुक्रवारी (ता. ३१) घेतला आहे.

‘वनामकृवि’स ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. कृषी विद्यापीठास संशोधनासाठी ५० कोटी रुपये निधी देण्यात येईल, असे २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आले होते. या संदर्भात संशोधन विषयक प्रस्ताव सादर करण्याबाबत कळविण्यात आले होते.

त्यानुसार ‘वनामकृवि’ने संशोधन विषयक कार्याला गती मिळावी याकरिता ८ संशोधन विषयक प्रस्ताव सादर केले होते. त्यासाठी २५ कोटी रुपये निधी वितरणास मंजुरी देण्यात आली.

परभणी येथील अखिल भारतीय समन्वित हवामान संशोधन प्रकल्पांतर्गत पीक आणि प्रजोत्पती (जिनोटाइप) मधील सूक्ष्म हवामान प्रयोगशाळेसाठी १ कोटी ७० लाख रुपये, परभणी कृषी महाविद्यालयातील मृदाविज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभागा अंतर्गत स्वयंचलित माती परीक्षण प्रयोगशाळेसाठी २ कोटी ७० लाख रुपये, परभणी येथील वनस्पती रोगशास्त्र विभाग अंतर्गत वनस्पती आरोग्य चिकित्सा प्रयोगशाळेसाठी ३ कोटी १२ लाख रुपये, नांदेड येथील कापूस संशोधन केंद्रामध्ये बी. टी. कापूस बियाणे संदर्भातील समस्या निवारण प्रयोगशाळेसाठी २ कोटी ५५ लाख रुपये निधी आहे.

तर लातूर येथील विलासराव देशमुख कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयामध्ये अत्याधुनिक जैवतंत्रज्ञान प्रयोगशाळेसाठी ५ कोटी ८५ लाख रुपये, छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रीय कृषी संशोधन येथे जैविक खते निर्मिती प्रयोगशाळेसाठी १ कोटी ६० लाख रुपये, अंबाजोगाई (जि. बीड) येथील सीताफळ संशोधन केंद्रा अंतर्गत सीताफळ संशोधन व प्रक्रिया प्रयोगशाळेसाठी ३ कोटी ९२ लाख रुपये मंजूर केले आहेत.


यंदा ८ कोटी ४० लाख वितरणास मंजुरी
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत संशोधनासाठी २०२२-२३ या वर्षात ८ कोटी ४० लाख रुपये निधी वितरणास या शासन निर्णयाद्वारे मंजुरी देण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

E-Peek Pahani: शेतकऱ्यांचं टेन्शन मिटलं! ई- पीक पाहणी प्रक्रियेत मोठा बदल, सहायकांची नियुक्ती, शासन निर्णय जारी

Farmer Fraud: शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करा

Pikvima Scam: पीकविमा अर्जासाठी सीएससी चालकांकडून शेतकऱ्यांची लूट

Dairy Farming: नवतंत्रज्ञानातून दुग्ध उत्पादनात वाढ शक्य

Pik Vima Dharashiv: गतवर्षीच्या खरिपातील पीकविम्याचा मार्ग मोकळा

SCROLL FOR NEXT