MahaDBT Agrowon
ताज्या बातम्या

MahaDBT : महाडीबीटी पोर्टलवर २४ तास अर्ज करण्याची सुविधा

महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना अर्ज करण्याची सुविधा २४ तास उपलब्ध असून समाजमाध्यमातून पसरविण्यात येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे.

Team Agrowon

Latest Agriculture News महाडीबीटी पोर्टलवर (MahaDBT Portal) शेतकऱ्यांना अर्ज करण्याची सुविधा २४ तास उपलब्ध असून समाजमाध्यमातून पसरविण्यात येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन कृषि विभागामार्फत (Agriculture Department) करण्यात आले आहे.

राज्य सरकारच्या कृषी विभागामार्फत विविध योजनांच्या लाभासाठी महाडीबीटीवर ऑनलाईन अर्जाची सुविधा उपलब्ध आहे.मात्र, योजनांचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्जाची व सोडतीची मुदत १५ मेपर्यंत असून १५ मे नंतर जवळपास २ ते ३ महिने ऑनलाइन शेतकरी निवड सोडत होणार नाही, अशा आशयाचे संदेश अज्ञातांमार्फत विविध सामाज माध्यमांवर पसरविण्यात येत आहेत.

महाडीबीटी पोर्टल संदर्भात अशाप्रकारचा कोणताही संदेश किंवा माहिती कृषी विभागामार्फत देण्यात आलेली नाही, कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी २४ तास सुविधा उपलब्ध आहे.

तसेच अर्ज केलेल्या घटकांची सोडत शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जानुसार व आवश्यकतेनुसार दर आठवड्याला काढण्यात येत असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांनी https://mahadbt.maharashtra.gov.in/ या पोर्टलवर शेतकरी योजना या पर्यायावर जाऊन विविध लाभाच्या घटकांसाठी अर्ज करावेत, असेही आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

E-Peek Pahani: शेतकऱ्यांचं टेन्शन मिटलं! ई- पीक पाहणी प्रक्रियेत मोठा बदल, सहायकांची नियुक्ती, शासन निर्णय जारी

Farmer Fraud: शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करा

Pikvima Scam: पीकविमा अर्जासाठी सीएससी चालकांकडून शेतकऱ्यांची लूट

Dairy Farming: नवतंत्रज्ञानातून दुग्ध उत्पादनात वाढ शक्य

Pik Vima Dharashiv: गतवर्षीच्या खरिपातील पीकविम्याचा मार्ग मोकळा

SCROLL FOR NEXT