Paddy Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Paddy Crop Damage : रत्नागिरीत २३४ हेक्टर भातशेतीचे पावसामुळे नुकसान

Team Agrowon

Ratnagiri News : मागील आठवड्यात पावसाने विश्रांती घेतली असून तीन-चार दिवसांपासून दुपारी सूर्यदर्शन होत आहे. मागील महिन्यात शेवटच्या टप्प्यात पडलेल्या पावसामुळे २३४ हेक्टर भातशेतीचे नुकसान झाले. शेतकऱ्यांना मदतीसाठी २१ लाख ३४ हजार रुपये निधीची तरतदू करावी लागणार आहे.

मॉन्सूनचे आगमन जूनमध्ये शेवटच्या आठवड्यात झाले. त्यानंतरही पावसाचा जोर कमी-अधिक प्रमाणात होता; मात्र जुलैच्या अखेरीस सलग आठ दिवस मुसळधार पावसाने ठाण मांडले होते. जिल्ह्यातील सर्व मोठ्या नद्यांना पूर आला होता. किनारी भागातील भातशेती पाण्याखाली होती. घरे, दुकानेही बाधित झाली आहेत.

पाऊस लांबल्यामुळे भात लावण्याही रखडल्या होत्या. नदी किनारी परिसरातील भात लावण्या लवकर आटपून घेण्यात आल्या; मात्र पुरामुळे गाळमिश्रीत पाणी शेतीत शिरल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. कृषी विभागाकडून तत्काळ पंचनामेही करण्यास सुरुवात झाली. जून आणि जुलै या दोन महिन्यांतील नुकसानीचा अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आला आहे.

यामध्ये १ हजार ०६२ शेतकऱ्यांना पुराचा फटका बसला आहे. त्यांच्या २३३.९४ हेक्टर क्षेत्राचे २१ लाख ३४ हजार ४२२ रुपयांचे नुकसान झाले आहे. यामध्ये ०.०५ हेक्टरचे भाजीपाल्याचे क्षेत्राचा समावेश आहे. पुरामुळे जमीन वाहून गेल्यामुळे ०.११ हेक्टरचे नुकसान झाले आहे. सर्वाधिक फटका खेड तालुक्याला बसला. पुरामुळे जिल्ह्यातील ६६ शेतकऱ्यांच्या २ हेक्टरवरील फळबागायतींचेही नुकसान झाले आहे.

तालुका बाधित शेतकरी क्षेत्र (हेक्टर) अपेक्षित निधी (रुपये)

रत्नागिरी ३४१ ६८ ५ लाख ७८ हजार

लांजा २ ०.०७ ०२ हजार

राजापूर १३० ३३.६७ २ लाख ८९ हजार ३५०

चिपळूण ८६ २४.९४ २ लाख १७ हजार ४२५

दापोली ६३ ४.४४ ६९ हजार

खेड ४१७ ९७.८५ ९ लाख ११ हजार ५५

मंडणगड २३ ४.९७ ६७ हजार ५९२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar MSP : इथेनॉलसह साखरेच्या एमएसपीत वाढ करण्याच्या हालचाली

Banana Rate : केळीला ३२०० रुपये कमाल दर

Potato Production : शिरदाळ्यात बटाटा उत्पादनात घट

pH Level of Water : कीडनाशकांच्या लेबलवर नमूद राहील पाण्याचा सामू

Onion Rate : नगरमध्ये कांदा प्रति क्विंटल ५२०० रुपये

SCROLL FOR NEXT