Crop Insurance Agrowon
ताज्या बातम्या

Crop Insurance : गेल्या वर्षीच्या पीक नुकसानीच्या २२ कोटींची शेतकऱ्यांना प्रतिक्षा

टीम ॲग्रोवन

यवतमाळ : जिल्ह्यात गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी, (Wet Drought) गारपीट झाली. चार तालुक्यांतील २२ हजार ७८२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान (Crop Damage) झाले होते. या नुकसानीचा २२ कोटी ८० लाख रुपयांचा प्रस्ताव शासन दरबारी पाठविण्यात आला आहे. मात्र अजूनही निधी आलेला नसून शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात मुसळधार पाऊस झाला. यात दारव्हा, पुसद, उमरखेड, पांढरकवडा तालुक्यातील २६ हजार ८३३ शेतकऱ्यांचे नुकसान झाले. २२ हजार ७८२ हेक्टरवरील खरीप पिकांना फटका बसला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी २२ कोटी ८० लाखांच्या मदतनिधीचा प्रस्ताव शासन दरबारी पाठविण्यात आला आहे. शासनस्तरावरून अद्यापपर्यंत निधी वितरित करण्यात आलेला नाही.

वर्ष लोटल्यानंतरही मदत मिळाली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चीड निर्माण झाली आहे. नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यातील पावसामुळे १७ हजार ४८ शेतकऱ्यांचे ११ हजार १०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीचा अकरा कोटी ४३ लाख ६२ हजार रुपयांचा प्रस्ताव शासनस्तरावर पाठविला होता. या प्रस्तावाला शासनाने मंजुरी दिली आहे. तालुकास्तरावर निधीसुद्धा वितरित करण्यात आले. ऑक्टोबर महिन्यातील निधी न आल्याने शेतकऱ्यांच्या नजरा शासन निर्णयाकडे लागल्या आहेत.

पांढरकवडा तालुक्यात बारा हजारांहून अधिक हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. असे असतानाही रुंझा सर्कल वगळण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन नुकसानाची माहिती दिली. त्यामुळे नव्याने प्रस्ताव पाठविण्यात आला होता. आता तो प्रस्ताव मंजूर होणे अपेक्षित आहे.

-निमीष मानकर,

माजी सदस्य, जिल्हा परिषद

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Update : मॉन्सूनच्या परतीसाठी पोषक स्थिती

Ginger Rate : आले दरात पंधरा दिवसांत चार ते पाच हजारांची घट

Marathwada Rain : मराठवाड्यात पावसाचा इशारा

Palm Oil Prices : जागतिक बाजारात पामतेलाचे भाव वाढलेले; मलेशियाला होतोय फायदा

Soybean Cotton Madat : पहिल्या टप्प्यात ४६ लाख शेतकऱ्यांचं सोयाबीन, कापूस अनुदान जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT