Crop Damage Compensation  Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage Compensation : मागणी २२ कोटींची, मात्र ८.७ कोटी मंजूर

Crop Damage : या सुधारित मागणीनुसार जामखेड तालुक्याची मागणी १० कोटी ४० लाख रुपयांची होती. मात्र प्रत्यक्षात ८ कोटी ७० लाख रुपये मंजूर झाले आहेत.

Team Agrowon

Jamkhed News : अतिवृष्टीने पिकांचे झालेल्या नुकसानीचे गेल्या वर्षी पंचनामे झाले, मात्र आज आठ महिन्यांनंतरही जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी २२ कोटींची मदत मिळण्याऐवजी केवळ ८ कोटी ७० लाख रुपयांचे अनुदान मंजूर झाल्याने तालुक्यातील अनेक शेतकरी वंचित राहणार आहेत.

यासंदर्भात २७ मार्च २०२३ रोजी राज्य सरकारच्या महसूल व वन विभागाने परिपत्रक काढून, अतिवृष्टीमध्ये झालेल्या नुकसानीपोटी मदत देण्याच्या निकषात बदल केला. या परिपत्रकानुसार नुकसान भरपाईपोटी मिळणारी मदत निम्म्याहून अधिक कमी झाली.

या परिपत्रकाला धरून, महसूल व वन विभागाने २२ जून २०२३ रोजी नवीन परिपत्रक काढून २७ मार्च २०२३ च्या परिपत्रकानुसार अनुदानाची सुधारित मागणी करण्याचे आदेश महसूल प्रशासनाला दिले. या सुधारित मागणीनुसार जामखेड तालुक्याची मागणी १० कोटी ४० लाख रुपयांची होती. मात्र प्रत्यक्षात ८ कोटी ७० लाख रुपये मंजूर झाले आहेत.\

अशी केली होती अनुदानाची मागणी

याप्रकरणी पिकांच्या नुकसान भरपाई पोटी शासनाकडे जिरायत पिकांसाठी १६ कोटी ३१ लाख, तर बागायत पिकांसाठी ५ कोटी ४१ लाख अशी एकूण २२ कोटी रुपये सरकारी अनुदानाची मागणी करण्यात आली होती.

अंशतः पडझड झालेल्या ११ घरांसाठी नवीन निकषाप्रमाणे १ लाख ६५ हजाराच्या अनुदानाची मागणी करण्यात आली होती. एका बैलाचा वीज पडून मृत्यू झाल्याने त्यासाठी ३० हजार रुपये अनुदान मागणी करण्यात आली होती.

दृष्टिक्षेपात...

जामखेडमधील ८७ महसूल गावात पीक नुकसानीचे पंचनामे

२३ हजार ६५६ अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचे नुकसानीचे पंचनामे

१३ हजार ९९५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान

२२ कोटी रुपये अनुदानाची मागणी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT