Department Of Revenue Agrowon
ताज्या बातम्या

Revenue Department : जळगावात महसूल विभागाच्या वसुलीत २० टक्क्यांनी वाढ

जुनी पेन्शन योजना राज्य कर्मचाऱ्यांना लागू करावी, या मागणीसाठी गेल्या १४ मार्चपासून शासकीय कर्मचाऱ्यांनी संप सुरू केला होता.

Team Agrowon

Jalgaon News जळगाव : जुनी पेन्शन योजना (Old Pension Scheme) राज्य कर्मचाऱ्यांना लागू करावी, या मागणीसाठी गेल्या १४ मार्चपासून शासकीय कर्मचाऱ्यांनी संप सुरू केला होता. तो गेल्या सोमवारी (ता. २०) मागे घेण्यात आला. (Latest Marathi News)

संप मिटताच तीन दिवसांत वार्षिक वसुली वेगाने सुरू झाली आहे. संपाअगोदर असलेली ३८.६९ टक्के वसुली ६३ टक्के झाली आहे. अजून सहा दिवस शिल्लक असल्याने शंभर टक्के वसुलीचा प्रयत्न असल्याचे महसूल विभागातर्फे सांगण्यात आले.

शासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपात महसूल विभागाचे अकराशेवर कर्मचारी सहभागी झाले होते. मार्च महिना वर्षभरातील महसूल वसुलीचा असतो. १ मार्चला जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन महसूल वसुली पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

पंतप्रधान ग्रामीण योजनेची प्रलंबित प्रकरणे त्वरित पूर्ण करा, गौणखजिन व जमीन महसूलबाबत दिलेले लक्षांक अधिकाऱ्यांना वेळेत पूर्ण करण्यास सांगितले होते. मात्र, १४ पासून कर्मचाऱ्यांनी संप सुरू केला होता. यामुळे महसूली वसुली ३९ टक्क्यांवर बंद झाली होती.

संप काळात अधिकारी केवळ कार्यालयात होते. कर्मचारी संपावर होते. मार्चअखेरची कामे कशी पूर्ण करावीत, असा प्रश्‍न अधिकाऱ्यांना पडला होता. संपामुळे मार्चअखेर खर्च करावयाचा निधीही परत जाणार होता. मात्र, संप सातव्या दिवशी मिटल्याने अधिकाऱ्यांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला. संप मिटल्यानंतर सर्वच महसूल विभागाचे कर्मचारी महसूल वसुलीला लागल्याने ३९ टक्क्यांवर असलेली वसुली ६३ टक्क्यांवर गेली आहे.

महसूल वसुली अशी

तालुका वसुली टक्केवारी

बोदवड १ कोटी ४० लाख ४०.०९ टक्के

जळगाव ९ कोटी ९४ लाख ३५.९७

भडगाव २ कोटी ७० लाख ५१.५६

चोपडा ३ कोटी ८४ लाख ५१.२६

अमळनेर ५ कोटी १३ लाख ५५.४६

पारोळा २ कोटी ५५ लाख ५६.८४

धरणगाव ५ कोटी ६४ लाख ६६.३९

चाळीसगाव १० कोटी ४१ लाख ६५.११

पाचोरा ६ कोटी ६९ लाख ६९.९६

मुक्ताईनगर ४ कोटी १४ लाख ७४.०१

यावल ५ कोटी ८२ लाख ७७.६८

भुसावळ ९ कोटी ३० लाख ७५.९८

रावेर ६ कोटी ३६ लाख ८७.७५

जामनेर ८ कोटी ७२ लाख १०३.१६

एरंडोल ७ कोटी ७५ लाख ८८.५८

एकूण ८१ कोटी ६५ लाख ६३.२३ टक्के

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT