Grampanchyat Election Agrowon
ताज्या बातम्या

Grampanchyat Election : महाडमध्ये २० ग्रामपंचायती बिनविरोध

सरपंच व सदस्य पदाकरिता एकमेव अर्ज दाखल

Team Agrowon

महाड : तालुक्यात ७३ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी (Grampanchyat Election ) सरपंच पदासाठी २१६ तर सदस्यपदांसाठी ९५६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. या पैकी २० ग्रामपंचायतींमध्ये सरपंच व सदस्यांकरिता एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्‍या बिनविरोध होण्याची शक्यता आहे. बुधवारनंतर (ता. ७) उर्वरित चित्र स्पष्ट होणार आहे.

तालुक्यातील ७३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी दोन डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. दासगाव, नांदगाव बुद्रूक, नडगाव तर्फे बिरवाडी, लोअर तुडील, अप्पर तुडील, कांबळे तर्फे बिरवाडी, मोहप्रे, वहूर, रानवडी खुर्द, बीजघर, तळीये, बारसगाव, करंजाडी, शिरगाव, गांधारपाले, चिंभावे, ताम्हाणे, लाडवली, अंबवडे, शिरवली, वरंध, करंजखोल या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदासाठी अटीतटीची लढत होण्याची शक्यता वर्तवली जात असल्‍याने राजकीय पक्षांनी ताकद लावली आहे. बिनविरोध २० ग्रामपंचायतींमध्ये कोंझर, पुनाडेतर्फे नाते, वाळण खुर्द, दादली, किंजलघर, नागाव, पिंपळवाडी रुपवली, आचलोली, मोहोत, निगडे, कुंबळे, दापोली, राजीवली, पाचाड, शिरसवणे, वडवली, केंबुर्ली, फाळकेवाडी, चांभारखिंड यांचा समावेश आहे.

दोन ठिकाणी सरपंचपदे राहणार रिक्त

महाड तालुक्यातील कुंबळे व फाळकेवाडी या दोन ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदासाठी कोणीही उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. फाळकेवाडी येथील सरपंच पदाचे आरक्षण ओबीसीसाठी राखीव आहे. परंतु फाळकेवाडी गावामध्ये मराठा समाजाचे पूर्णपणे बहुमत असून व संपूर्ण वस्ती मराठा समाजाची असल्याने या ठिकाणी ओबीसी उमेदवार नसल्याने सरपंच पद हे रिक्त राहिले आहे. तर कुंबळे येथेही सरपंचपद ओबीसी महिलेसाठी राखीव आहे. परंतु येथेही उमेदवार नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: कांद्याच्या भावावर दबाव कायम; सोयाबीन दरात वाढ, कापसातील तेजी टिकून, काकडी व सरकीला उठाव

Livestock Department Alert: ‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभाग सतर्क

Onion Harvest: कांदा काढणी खानदेशात सुरूच

Maharashtra Rain: राज्यात २ दिवस वादळी पावसाचा अंदाज; विदर्भात पुढील ३ दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा

Fertilizer Shortage: जळगाव जिल्ह्यात खतटंचाईची स्थिती

SCROLL FOR NEXT