APMC Election Agrowon
ताज्या बातम्या

APMC Election : धाराशिव जिल्ह्यात आठ बाजार समिती निवडणुकीसाठी १९३ उमेदवारी अर्ज दाखल

सध्यातरी महाविकास आघाडीची बोलणी सुरू असल्याचे सांगितले जात असले तरी माघारीच्या दिवसापर्यंत ही चर्चा सुरूच राहणार, असे सांगितले जात आहे.

Team Agrowon

धाराशिव ः जिल्ह्यात आठ बाजार समितीच्या निवडणुकांचा (APMC Election) बिगूल वाजला असून सोमवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरवात झाली आहे.

आतापर्यंत जिल्ह्यात १९३ उमेदवारी (Nomination) अर्ज दाखल करण्यात आले आहेत. पुढील दोन दिवसात खऱ्या अर्थाने अर्ज भरण्यासाठी झुंबड उडण्याची शक्यता आहे.

सध्यातरी महाविकास आघाडीची बोलणी सुरू असल्याचे सांगितले जात असले तरी माघारीच्या दिवसापर्यंत ही चर्चा सुरूच राहणार, असे सांगितले जात आहे. भाजपने मात्र सवतासुभा मांडला असून ज्या ठिकाणी भाजपची शक्ती कमी आहे. त्या बाजारसमितीमध्ये त्यांनी शिंदे गटाला बळ देण्याची भूमिका स्वीकारली असल्याचे सांगितले जाते.

बाजारसमितीच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यामध्ये अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून शनिवार व रविवारी सुट्टीचे दिवस असल्याने आता सोमवार व मंगळवार हे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. या दोन दिवसात अर्ज भरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

प्रत्येकी १८ जागेसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी आतापर्यंत साधारण १९३ अर्ज दाखल झाले. सर्वाधिक अर्ज उमरगा व कळंब बाजारसमितीमध्ये आले आहेत. जिल्ह्यात १३ हजार ४४१ एवढ्या मतदारांना आठ बाजारसमितीमध्ये मतदानाचा अधिकार प्राप्त झाला आहे.

अर्ज दाखल झालेल्या समिती

परंडा २५

कळंब ३९

मुरूम १२

धाराशिव २१

तुळजापूर १५

भूम १७

वाशी २५

उमरगा ३९

एकूण १९३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heavy Rain In Maharashtra : केंद्रीय कृषिमंत्री चौहान यांनी घेतला नुकसानीचा आढावा; शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन

Scientific Onion Storage: शास्त्रीय पद्धतीने कांदा साठवणूक

Summer Crop Sowing: तीन जिल्ह्यांत २४ हजार८६२ हेक्टरवर पेरणी

Fodder Availability: मुबलक चाऱ्यामुळे पशुपालकांची चिंता मिटली

Agro Input Dealers Association: दोषांची जबाबदारी उत्पादकांवर असावी: ‘ॲग्रो इनपुट डीलर्स असोसिएशन

SCROLL FOR NEXT