Government Fund Agrowon
ताज्या बातम्या

Government Fund : तलाठी, मंडळाधिकारी कार्यालय बांधकामासाठी १९ कोटींचा निधी

शिंदखेडा तालुक्यातील दहा मंडळाधिकारी कार्यालये व निवासस्थान, तसेच ५० तलाठी कार्यालयांच्या बांधकामासाठी १९ कोटींच्या निधीची मागणी माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल यांनी केली होती.

टीम ॲग्रोवन

धुळे ः शिंदखेडा तालुक्यातील दहा मंडळाधिकारी कार्यालये व निवासस्थान, तसेच ५० तलाठी कार्यालयांच्या (Talathi Office) बांधकामासाठी १९ कोटींच्या निधीची (Government Fund) मागणी माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल यांनी केली होती. तिची पूर्तता महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrushn Vikhe Patil) यांनी केली असून, याकामी १९ कोटींच्या निधीला त्यांनी प्रशासकीय मंजुरी दिली आहे.

शिंदखेडा तालुक्यात मंडळाधिकारी कार्यालय व तलाठी कार्यालये ही ग्रामपंचायतीच्या कार्यालयात किंवा खासगी जागेत सुरू आहेत. त्यांना स्वतंत्र कार्यालये व्हावीत यासाठी आमदार रावल यांनी महसूलमंत्री विखे-पाटील यांच्याकडे निधीची मागणी केली होती. तिची दखल घेत महसूलमंत्र्यांनी निधीसह कामांसाठी प्रशासकीय मंजुरी दिली आहे.

तालुक्यातील सर्व मंडळाधिकारी कार्यालये व सजेच्या ठिकाणी नवी तलाठी कार्यालये उभारली जाणार असून, मंडळाधिकारी कार्यालयासाठी प्रत्येकी ४० लाख रुपये असा एकूण सरासरी चार कोटींचा निधी, तर तलाठी कार्यालयासाठी प्रत्येकी ३० लाख रुपये, असा एकूण १५ कोटींचा निधी खर्च होईल, असे आमदार रावल यांनी सांगितले. पाठपुराव्यामुळे तालुक्यात तलाठी, मंडळाधिकाऱ्यांना ही चांगली सोय होणार असल्याचे ते म्हणाले.

अशी होतील कार्यालये...

या गावांना होणार मंडळाधिकारी कार्यालय ः शिंदखेडा, दोंडाईचा,चिमठाणे, वर्शी, विरदेल, खलाणे, नरडाणा, बेटावद, विखरण, शेवाळे. या गावांना होणार तलाठी कार्यालये ः मालपूर, रामी, टाकरखेडा, निमगूळ, झोटवाडे, कुरकवाडे, बाह्मणे, कोडदे, खर्दे बुद्रुक, दाऊळ, हातनूर, कर्ले, देगाव मेथी, दिवी, दभाषी, होळ, वायपूर, चिरणे, महाळपूर, वालखेडा, अजंदे बुद्रुक, पढावद, मुडावद, म्हळसर, अमळथे, लोहगाव, तामथरे, दराणे, सवाई मुकटी, डांगुर्णे, पाटण, वरपाडे, वरसुस, वरूळ, भडणे, आरावे, कंचनपूर, वाघाडी, वारूड, गोराणे, कमखेडा, जातोडे, पाष्टे, चिलाणे, रंजाणे, चौगाव बुद्रुक, सुकवद, दत्ताणे, डाबली-धांदरणे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीन दरात चढ-उतार, गवार भावात घसरण, पालक आवकेत घट, वांगी दरात चढ-उतार तर डाळिंब दरात बदल

NCC Colonel Commandant Degree: कुलगुरू डॉ. शरद गडाख यांना मानद ‘कर्नल कमांडंट’ पदवी

Analog Paneer Ban: राज्यात कृत्रिम (एनालॉग) पनीरवर वर्षभराची बंदी

Water Conservation: श्रमदानातून पाणीदार झाले ‘सालईबन’

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

SCROLL FOR NEXT