Wet Drought Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : गोंदिया जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १७ कोटी रुपयांचे नुकसान

जिल्ह्यातील आठही तालुक्यांत अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे प्राणहानी, जनावरांचा मृत्यू, गोठे-घर यांचे नुकसान झाले. जिल्ह्यात पुरात वाहून गेलेल्या सात जणांचा समावेश आहे. वीज पडून पाच जणांचा मृत्यू झाला.

टीम ॲग्रोवन

गोंदिया : जिल्ह्यात यंदा एक जून ते ३१ ऑगस्ट या काळात झालेल्या अतिवृष्टीने (Heavy Rain) १७ कोटी ३६ लाख ७३ हजार २५० रुपयाचे नुकसान (Crop Damage) झाले. त्यानुसार निधी मागणीचा प्रस्ताव प्रशासनाने सादर केला आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यांत अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे प्राणहानी, जनावरांचा मृत्यू, गोठे-घर (Animal Death)यांचे नुकसान झाले.

जिल्ह्यात पुरात वाहून गेलेल्या सात जणांचा समावेश आहे. वीज पडून पाच जणांचा मृत्यू झाला. पुरामुळे गोंदिया जिल्ह्यातील ९७४ कुटुंब बाधित झाली होती. मनुष्यहानीकरिता ४८ लाख १७ हजार दोनशे रुपये, जनावरांसाठी वीस लाख २३ हजार २५० रुपये, घर गोठे यांच्या नुकसानीपोटी पंधरा कोटी ८६ लाख रुपये

तर बाधित व्यक्तींकरता ८२ लाख असे एकूण १७ कोटी ३६ लाख ७३ हजार २५० रुपयांची मागणी शासनाकडे केली आहे. गोंदिया जिल्ह्यात पावसाने १९९ घरे जमीनदोस्त झाली. ७२८८ घरांची अंशतः पडझड तर बाधित झालेल्या १८१८ गोठ्यांची पडझड झाली आहे. यांना मदतीपोटी १५ कोटी ८६ लाख ३२ हजार आठशे रुपये दिले जाणार आहेत.

पावसामुळे बारा जणांचा मृत्यू पावसामुळे गोंदिया जिल्ह्यात बारा जणांचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले. यातील १६ प्रकरणे जिल्हा प्रशासनाने मदतीसाठी पात्र केली आहेत. यातील पंधरा जणांना ४४ लाख १७ हजार दोनशे रुपयांची मदत देण्यात आली. अतिवृष्टीमुळे ७४ जनावरांचाही मृत्यू झाला.

यात मोठी दुधाळ जनावर ३१, लहान दुधाळ जनावरे १८, ओढकाम करणारी मोठी जनावरे १४ तर लहान जनावरे ११ दगावली आहेत. यातील मृत जनावरांच्या मालकांना सानुग्रह अनुदान म्हणून वीस लाख २३ हजार २५० रुपये देण्यात येणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Update In Maharashtra: कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील ६ जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज 

Crop Insurance: पीकविमा योजनेत शेतकऱ्यांना वेळेत नुकसान भरपाई मिळेना; कृषिमंत्र्यांची कबुली

Akola Heavy Rainfall: अकोला जिल्ह्यात सर्वदूर मॉन्सून पावसाची दमदार हजेरी

Seed Ball Making: सीड बॉल निर्मितीतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

Marathwada Rain 2026: छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यातील ९ मंडलांत अतिवृष्टी

SCROLL FOR NEXT