Crop Loan Agrowon
ताज्या बातम्या

Rabi Crop Loan Update : रब्बीसाठी १४४ कोटींवर पीककर्ज वितरीत

परभणी जिल्ह्यात या वर्षीच्या (२०२२-२३) रब्बी हंगामात मंगळवार (ता. १५)पर्यंत एकूण १४ हजार ९७६ शेतकऱ्यांना १४४ कोटी ७३ लाख रुपये (२३.१६ टक्के) कर्जवाटप झाले आहे.

टीम ॲग्रोवन

परभणी ः परभणी जिल्ह्यात या वर्षीच्या (२०२२-२३) रब्बी हंगामात मंगळवार (ता. १५)पर्यंत एकूण १४ हजार ९७६ शेतकऱ्यांना १४४ कोटी ७३ लाख रुपये (२३.१६ टक्के) कर्जवाटप (Crop Loan) झाले आहे. आजवरच्या कर्जवाटपात (Crop Loan Allocation) १२ हजार ३४२ शेतकऱ्यांनी ११७ कोटी २० लाख रुपये एवढ्या रकमेच्या कर्जाचे नूतनीकरण करून घेतले आहे, तर एकूण २ हजार ६३४ शेतकऱ्यांना २७ कोटी ५३ रुपये एवढ्या रकमेचे नवीन कर्जवाटप करण्यात आले.

परभणी जिल्ह्यात यंदाच्या (२०२२-२३) रब्बी हंगामात विविध बँकांना ६२४ कोटी ८० लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले. त्यात राष्ट्रीयीकृत बँकांना ३६१ कोटी ७३ लाख रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बँकेला ८६ कोटी ९५ लाख रुपये, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १२९ कोटी १८ लाख रुपये, खासगी बँकांच्या ४६ कोटी ९४ लाख रुपये उद्दिष्टाचा समावेश आहे.

गत तुलनेत यंदा पीककर्ज वाटपाच्या उद्दिष्टात १७ कोटी ८२ लाख रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. मंगळवार (ता. १५)पर्यंत राष्ट्रीयीकृत बँकांनी १२ हजार १६७ शेतकऱ्यांना ११७ कोटी २४ लाख रुपये (३२.४१टक्के) पीककर्ज वाटप केले.

महाराष्ट्र ग्रामीण बँकेने २ हजार ६६ शेतकऱ्यांना २० कोटी ७४ लाख रुपये (२३.८५ टक्के), जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ४२८ शेतकऱ्यांना १ कोटी ८७ लाख रुपये (१.४५ टक्के), खासगी बँकांनी ३१५ शेतकऱ्यांना ४ कोटी ८८ लाख रुपये (१०.४० टक्के) पीककर्ज वाटप केले आहे.

भारतीय स्टेट बँकेने पीककर्ज वाटपात आघाडीवर आहे. परंतु कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, युको बँक या राष्ट्रीयीकृत बँका तसेच अॅक्सिस बँक या खासगी बँकेने पीककर्ज वाटप सुरू केल्याची माहिती नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Budget for Farmer 2026 : शेतकऱ्यांसाठी 'भारत-विस्तार एआय टूल', अर्थमंत्र्यांची घोषणा; नारळ, काजू आणि चंदन उत्पादकांसाठी घोषणा

Textile Industry: कापूस उद्योगासाठी मोठी घोषणा; वस्त्रोद्योगासाठी सर्वसमावेशक ५ कलमी कार्यक्रम जाहीर

Cultural Economy: निसर्गप्रधान जीवनशैली व सांस्कृतिक-अर्थकारण

National Waterways: पुढील पाच वर्षात २० राष्ट्रीय जलमार्ग सुरु करणार; अर्थमंत्र्यांची घोषणा

Grass lands: गवताळ राने जपणे गरजेचे

SCROLL FOR NEXT