water tab agrowon
ताज्या बातम्या

Jal Jeevan Mission : देशात 12 कोटींहून अधिक नळाला आलं पाणी...; ग्रामीण महाराष्ट्रात २४ टक्के लोकं वंचित

Har Ghar Jal Abhiyan : देशातील 14.44 कोटी ग्रामीण कुटुंबांपैकी 12 कोटी लोकांना जल जीवन मिशन (JJM) अंतर्गत नळ जोडणी देण्यात आली आहे.

Team Agrowon

Jal Jeevan Mission Update : जल जीवन मिशनने (JJM) देशभरातील 12 कोटी ग्रामीण कुटुंबांना नळांद्वारे सुरक्षित आणि शुद्ध पिण्याचे पाणी पुरवून एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे, असे जलशक्ती मंत्रालयाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीवारून स्पष्ट होत आहे. या मिशनंतर्गत गोवा, तेलंगणा, हरियाणा, गुजरात आणि पंजाबमधील सर्व घरांना नळांने पाणी पुरवठा केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १५ ऑगस्ट २०२९ रोजी हे अभियान सुरू केले होते, त्या वेळी केवळ ३.२५ कोटी ग्रामीण कुटुंबांना पाईपद्वारे पाण्याची जोडणी उपलब्ध होती. एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत १२ कोटींहून अधिक ग्रामीण कुटुंबांना पिण्याचे शुद्ध पाणी पुरवण्यात येत आहे. यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारांच्या अथक प्रयत्नांमुळे देशभरातील ९.०६ लाख (८८.५५ %) शाळा आणि ९ लाख ३९ हजार लाख (८४ %) अंगणवाडी केंद्रांमध्ये नळ पाणीपुरवठा उपलब्ध झाला आहे.

या मिशनंतर्गत गोवा, तेलंगणा, हरियाणा, गुजरात, पंजाब या पाच राज्यांमध्ये पुडुचेरी, दादरा-नगर हवेली, दमण-दीव, आणि अंदमान आणि निकोबार बेटे या तीन केंद्रशासित प्रदेशामध्ये 100% कुटुंबांना नळाने पाणी पुरवठा केला जातो.

या क्रमवारीमध्ये महाराष्ट्राचा

मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्राचा १६ वा क्रमांक लागतो. राज्यामधील ग्रामीण भागातील १ कोटी ४६ लाख ७३ हजार २५७ घरांपैकी १ कोटी ११ लाख ३२ हजार ७४६ कुटुंबाना नळाने पाणी पुरवठा केला जाते. सुमारे २४ टक्के कुटुंबाना नळाने पाणी पुरवठा होत नाही. नजिकच्या काळात त्यांना पाणी पुरवठा केला जाणार आहे.

या मिशनमुळे ग्रामीण भागात नियमित नळाच्या पाणीपुरवठ्याने लोकांना, विशेषत: स्त्रियांना त्यांच्या दैनंदिन घरगुती गरजा भागवण्यासाठी दुर अंतरावरून हंड्याने पाणी वाहून नेहण्याची गरज भासत नाही. वाचवलेल्या वेळेचा उपयोग उत्पन्न वाढीसाठी, नवीन कौशल्ये शिकण्यासाठी आणि मुलांच्या शिक्षणासाठी केला जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Budget 2026: कोरडवाहू शेतीत कृषी संलग्न व्यवसायाला चालना

Agri Union Budget 2026: अन्नदाता शेतकऱ्यांचा भ्रमनिरास

Union Budget 2026: शेती बेदखलच!

Union Budget 2026: आर्थिक वाढीसाठी सर्वंकष प्रयत्नांचा संकल्प

Agriculture Union Budget: अन्नदाता शेतकरी पुन्हा एकदा वाऱ्यावर...!

SCROLL FOR NEXT