Lumpy Skin Agrowon
ताज्या बातम्या

Lumpy Skin : रत्नागिरीत ‘लम्पी स्कीन’मुळे १२ जनावरांचा मृत्यू

रत्नागिरी ः जिल्हाभरात आतापर्यंत एकूण ७८ जनावरे लम्पी स्कीनबाधित आढळली आहेत. त्यातील १२ जनावरांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आली.

टीम ॲग्रोवन

रत्नागिरी ः जिल्हाभरात आतापर्यंत एकूण ७८ जनावरे लम्पी स्कीनबाधित (Lumpy Skin) आढळली आहेत. त्यातील १२ जनावरांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आली.

जिल्ह्यात लम्पी स्कीन आजाराची लागण जनावरांमध्ये दिसून येत आहे. लम्पी स्कीन आजाराचा फैलाव दिवसागणिक वाढत चालल्याने जिल्हा परिषद पशुसंवर्धन विकास विभाग दक्ष झाला आहे. लसीकरणाच्या मोहिमेला गती देण्यात आली आहे.

जिल्हाभरात पशुसंवर्धन विभागामार्पत जनावरांना लसीकरणाविषयी जनजागृती केली जात आहे. तसेच जनावरांवर फवारणीचे नियोजनही करण्यात येत आहे. जिल्ह्यात मागील जनगणनेनुसार एकूण २ लाख ३५ हजार पशुपालकांकडे पशुधन आहे. २ लाख जनावरांचे लसीकरण झाले आहे. रत्नागिरी तालुक्यातील काळबादेवी, ढोकमळे, नेवरे, सडये येथील ४ जनावरे बाधित आढळली.

जिल्ह्यातील पशुपालकांनी गोठ्यांची स्वच्छता, तसेच आजारी गुरांविषयी योग्य ती खबरदारी घ्यावी. या आजाराच्या प्रतिबंधासाठी तातडीने पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा.
डॉ. अभिजित कशाळकर, पशु संवर्धन अधिकारी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT