Onion Subsidy Agrowon
ताज्या बातम्या

Onion Subsidy : जुन्नरच्या ४ हजार शेतकऱ्यांना मिळणार कांद्याचे ११ कोटी अनुदान

Team Agrowon

Onion News Today : जुन्नर बाजार समितीच्या उपबाजार आवारात १ फेब्रुवारी २०२३ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत विक्री केलेल्या ३ लाख १५ हजार ६४४ क्विंटल कांद्याला प्रतिक्विंटल ३५० रुपये प्रमाणे ११ कोटी ४ लाख ७५ हजार ५६१ रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे.

शासनाने लागू केलेल्या कांदा अनुदान योजनेचा लाभ जुन्नर बाजार समितीत विक्री केलेल्या ४ हजार ५६२ कांदा उत्पादक शेतकऱ्यांना झाला आहे, अशी माहिती उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे व उपसभापती प्रकाश ताजणे यांनी दिली.

राज्यात फेब्रुवारी २०२३ च्या सुरुवातीस कांद्याच्या बाजारभावात मोठी घसरण झाली होती. विविध शेतकरी संघटना, लोकप्रतिनिधी आणि शेतकऱ्यांकडून कांद्याला अनुदान द्यावे, अशी मागणी केली होती.

त्यानुसार कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी १ फेब्रुवारी २०२३ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत राज्यातील बाजार समिती, खासगी बाजार समिती, अथवा ‘नाफेड’कडे विक्री केलेल्या कांद्याला राज्य सरकारने प्रतिक्विंटल ३५० रुपये किंवा प्रतिशेतकरी जास्तीत जास्त २०० क्विंटल कांद्याला अनुदान मंजूर करण्याचा निर्णय २७ मार्च २०२३ रोजी जाहीर केला होता.

बॅंक खात्यावर जमा होणार

जुन्नर बाजार समितीच्या जुन्नर, ओतूर, आळेफाटा, नारायणगाव बाजार आवारात १ फेब्रुवारी २०२३ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत ४ हजार ५६२ कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी ३ लाख १५ हजार ६४४ क्विंटल कांद्याची विक्री केली होती.

या शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ३५० रुपयांप्रमाणे ११ कोटी ४ लाख ७५ हजार ५६१ रुपयांचे अनुदान देय होते. त्यानुसार अनुदान मंजूर झाले आहे. हे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच जमा होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop : वाढलेल्या सोयबीनमध्ये शेंगांचा शोध

Agricos Welfare Society : ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांकडून सेवाभावी संस्थेला मदत

E-Peek Pahani : छप्पन टक्के शेतकऱ्यांनी नोंदविली ई-पीकपाहणी

Crop Damage Compensation : नांदेडमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई

Integrated Agriculture : एकात्मिक शेती पद्धतीच्या यशस्वी मॉडेलचा प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT