Ratnagiri APMC Election Agrowon
ताज्या बातम्या

Ratnagiri APMC Election : रत्नागिरीत सर्वपक्षीय सहकार पॅनेलचे ११ उमेदवार विजयी

रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ११ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सर्वपक्षीय सहकार पॅनेलने सर्वच्या सर्व जागांवर निर्विवाद यश संपादन केले.

Team Agrowon

Ratnagiri APMC Election रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ११ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सर्वपक्षीय सहकार पॅनेलने सर्वच्या सर्व जागांवर निर्विवाद यश संपादन केले. तीन उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले आहेत. तर तीन अपक्ष उमेदवारांचा पराभव झाला.

रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ११ जागांसाठी १४ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. शुक्रवारी (ता. २८) ११ हजार ११० मतदानापैकी ३ हजार ४१५ म्हणजे एकूण ३२.३७ टक्के मतदान झाले होते. शनिवारी (ता. २९) सकाळी रत्नागिरीत मतमोजणी झाली.

सहकार पॅनेलमधून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट असे सर्वच पक्ष एकत्र आले होते. मात्र, तीन अपक्ष उमेदवारांमुळे निवडणूक झाली. यामध्ये सहकार पॅनेलचे हेमचंद्र माने (भाजप), गजानन पाटील (शिंदे गट), सुरेश कांबळे (राष्ट्रवादी) हे तीन संचालक आधीच बिनविरोध निवडून आले आहेत.

११ जागांसाठी झालेल्या निवडणुकीच्या निकालात अरविंद आंब्रे (राष्ट्रवादी), विजय टाकळे (राष्ट्रवादी), मधुकर दळवी (शिंदे गट), नैनेश नारकर (ठाकरे गट), रोहित मयेकर (शिंदे गट), सुरेश सावंत (राष्ट्रवादी), संदीप सुर्वे (ठाकरे गट), स्मिती दळवी (राष्ट्रवादी), स्नेहर बाईत (ठाकरे गट), ओंकार कोलगे (शिंदे गट), प्रशांत शिंदे (ठाकरे गट) हे उमेदवार विजयी झाले. सहकार पॅनेलमधून ठाकरे गट, शिंदे गट यांना प्रत्येकी ४, भाजप, काँग्रेसला प्रत्येकी २, राष्ट्रवादीला ५ जागा देण्यात आल्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

Maize Excellence Center: ‘मका उत्कृष्टता केंद्र’ स्थापनेच्या प्रस्तावावर चर्चा

Jayakwadi Dam Water Released: जायकवाडी धरणातून खेर्डा प्रकल्पात पाणी पोहोचले!

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT