Crop Loan Agriculture
ताज्या बातम्या

Crop Loan : जिल्हा बॅंकेकडून रब्बी हंगामासाठी जिल्ह्यात १०.२५ कोटींचे कर्जवाटप

खरीप व रब्बी हंगामासाठी ३९ हजार ९२८ हेक्टर क्षेत्रावरील ५१ हजार ५८७ शेतकऱ्यांना ५७९.२४ कोटींचे कर्जवाटपाचे लक्षांक निश्चित करण्यात आले आहे.

टीम ॲग्रोवन

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडून यंदा रब्बी हंगामासाठी (Rabi Season) २७.४३ कोटी कर्ज वाटपाचे (Crop Loan) लक्षांक निश्चित करण्यात आले असून, यापैकी आतापर्यंत एक हजार सभासदांना १०.२५ कोटींचे (३७ टक्के) कर्ज वाटप (Loan Allocation) करण्यात आले आहे. संथगतीने असलेली पीक कर्ज वाटपाची प्रक्रियेला दिवाळीनंतर वेग येण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगामासाठी ३९ हजार ९२८ हेक्टर क्षेत्रावरील ५१ हजार ५८७ शेतकऱ्यांना ५७९.२४ कोटींचे कर्जवाटपाचे लक्षांक निश्चित करण्यात आले आहे.

यात खरीप हंगामासाठी ५५१.८१ कोटींचे उद्दिष्ट्य होते. यापैकी ५० हजार ६५० शेतकऱ्यांना ३ नोव्हेंबर २०२२ अखेर ४४६.८२ कोटींचे कर्ज वाटप झाले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Local Body Election : ‘झेडपी’, पंचायत समित्यांचा बिगुल

Fertilizer Shortage : युरिया, डीएपीचा तुटवडा, लिंकिंगने शेतकरी त्रस्त

Ginger Research Center: आले संशोधन केंद्राचा पेच; कृषिमंत्र्यांच विधानपरिषदेत बैठकीचं आश्वासन 

Silk Market : बीड रेशीम कोष बाजारात शेतकऱ्यांचे शोषण

Turmeric Market : नांदेडला हळदीचे चुकारे थकल्याने लिलाव पाडले बंद

SCROLL FOR NEXT