Loan
Loan Agrowon
ताज्या बातम्या

नियमित कर्जदारांना १० हजार कोटींचे प्रोत्साहन

तात्या लांडगे

सोलापूर : दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी (Farmer Loan Wave) केल्यानंतर आता महाविकास आघाडी सरकारने २०१७-१८ पासून २०२० पर्यंत कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे. राज्यातील जवळपास २३ लाख शेतकरी त्यासाठी पात्र असून त्यांच्यासाठी दहा हजार कोटी रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान (Loan Incentive) दिले जाणार असल्याची माहिती सहकारमंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांनी दिली.

कॉमन मिनिमम प्रोग्रॅम तयार करीत काँग्रेसला सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. त्यांनी सुरुवातीला शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांना दीड लाखाची कर्जमाफी दिली. दीड लाखावरील थकबाकीदारांनाही एकरकमी परतफेड योजनेच्या माध्यमातून (ओटीएस) कर्जमाफी दिली. नियमित कर्जदारांना २५ हजारांचे प्रोत्साहनपर अनुदानही दिले. त्यानंतर सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने त्यात वाढ करून कर्जमाफी जाहीर केली. दोन लाखांपर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला. पण अद्याप दोन लाखांवरील थकबाकीदारांचा निर्णय झालेला नाही. आता कोरोनाच्या संकटातून बाहेर पडल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने २०१७-१८ पासून कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. ज्यांचे कर्ज ५० हजारांपेक्षा कमी आहे, त्यांना कर्जाएवढीच रक्कम प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे.

जिल्हा मध्यवर्ती बॅंकांसह राष्ट्रीयीकृत बॅंकांनी त्यांच्याकडील नियमित कर्जदारांची यादी सहकार विभागाला सादर केली आहे. त्याची छाननी सुरू असून, आयकर भरणारे, सरकारी कर्मचारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी अशा घटकांना त्यातून वगळले जाणार आहे. साधारणत: जूनअखेर पात्र शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान वितरीत केले जाणार आहे. तत्पूर्वी, मंत्रिमंडळाची बैठक होणार असून प्रोत्साहनपर अनुदान देताना दोन लाखांपर्यंतच्या ज्या पात्र कर्जदारांना लाभ मिळालेला नाही, त्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.

‘महाविकास’च्या कर्जमाफीची स्थिती

दोन लाखांपर्यंतचे शेतकरी

३६.६४ लाख

मिळालेली कर्जमाफी

२०,००० कोटी

अंदाजित नियमित कर्जदार

२३.११ लाख

प्रोत्साहनपर अनुदानाची तरतूद

१०,००० कोटी

दोन लाखांवरील थकबाकीदारांना कर्जमाफी देण्यासंदर्भात अजून निर्णय झाला नाही. पण आता नियमित कर्जदारांना ५० हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे. सर्व बॅंकांकडून सरकारला माहिती प्राप्त झाली असून आता काही दिवसांत ते अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहे.
बाळासाहेब पाटील, सहकारमंत्री

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disaster Relief Fund : रायगडमध्ये आपत्ती बचावासाठी हजार कोटी

Water Issue : शेतीसाठी ‘धनपूर’ धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा

Orchard Planting : एक हजार हेक्टरवर सांगलीत फळबाग लागवड

Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

Fertilizer Demand : चोपडा तालुक्याला २७ हजार टन खतांची गरज

SCROLL FOR NEXT