bunds
bunds Agrowon
ताज्या बातम्या

संगमनेर उपविभागात लोकसहभागातून उभारणार दहा हजार बंधारे

Team Agrowon

नगर ः कृषी सेवा केंद्र व लोकसहभागातून संगमनेर उपविभागात शून्य खर्चाचे दीड हजार वनराई बंधारे उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. प्रत्येक कृषी सहायकाने १० बंधारे उभारण्याचे नियोजन केले आहे, अशी माहिती संगमनेरचे उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी दिली. संगमनेर तालुक्यात बंधारे उभारण्याची मोहीम जोरात सुरू आहे. कृषी विभागासह शेतकऱ्यांचा त्याबाबत चांगला प्रतिसाद मिळत आहे असे संगमनेरचे तालुका कृषी प्रवीण गोसावी यांनी सांगितले.

नगर जिल्ह्यात दर वर्षी पावसाळ्याच्या शेवटी वाहत्या झालेल्या ओढ्या-नाल्यांचे पाणी अडवून त्यावर सोप्या तंत्राचा वापर करून बांधलेल्या वनराई बंधाऱ्यांमुळे पाणी साचून सिंचन, जमिनीचा ओलावा टिकवणे, तसेच उन्हाळ्यात उद्‍भवणाऱ्या पाणीटंचाईवरही मात करण्यासाठी संगमनेर उपविभागात ही मोहीम आखली आहे. जलसंधारणास मदतीसह रब्बी हंगामासाठी पिकांना व पशूपक्ष्यांसाठी पाणीसाठे उपलब्ध होऊन विहिरींची पाणीपातळी वाढण्यासाठी व उत्पन्नात भर घालणाऱ्या या उपक्रमाला शेतकरी वर्गाचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे.

उपविभागात स्थानिक शेतकरी, कृषी सेवा केंद्र संघटना, कृषी सेवक व कर्मचाऱ्यांच्या श्रमदानातून ही मोहीम यशस्वीरीत्या राबवली जात आहे. लोकसहभागातून राबवलेल्या या योजनेमुळे शासनाची प्रतिमा उंचावण्यास मदत होते. १० नोव्हेंबर रोजी कामाला सुरुवात झाली असून, उपविभागातील चार तालुक्यांतील प्रस्तावित दीड हजार बंधाऱ्यांपैकी ९५० बंधारे पूर्ण झाले आहेत, असे उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soil Health : शेतीतून शाश्वत उत्पादन मिळण्यासाठी मृदा आरोग्य जपा

Natural Resource : निसर्गसंपदा वाचविण्याची अनोखी चळवळ

Goat Rearing : शेळीपालनात अभ्यासपूर्ण व्यवस्थापनाला प्राधान्य

Agriculture Corporation : महामंडळातर्फे शेतीमालाचे वितरण

Poultry Chicken Management : कोंबड्यांच्या व्यवस्थापनात बदल आवश्यक

SCROLL FOR NEXT