Onion Rate Agrowon
ताज्या बातम्या

Onion Rate : फिलिपिन्समध्ये कांदा १००० रुपये किलो !

मागील वर्षी आलेल्या वादळाचा देशातील शेतीला मोठा फटका बसला. पिकांचे मोठे नुकसान झाले. परिणाम कांदा उत्पादनही घटले. परिणामी दोन महिन्यांपासून या देशामध्ये कांद्याचे दर वेगाने वाढत आहेत.

Team Agrowon

Onion Market News फिलिपिन्स (वृत्तसंस्था) : या देशात गेल्या दीड महिन्यांपासून कांदा ६०० ते ८०० पेसो (सुमारे ९१९ ते १२२५ भारतीय रुपये) दराने (Onion Rate) विकला जात आहे. यामुळे येथे चक्क कांद्याची तस्करीही (Onion Smuggling) येथे सुरू झाली आहे. चिकन, मटनापेक्षाही कांदा दर (Onion Market Rate) येथे जास्त आहेत.

मागील वर्षी आलेल्या वादळाचा देशातील शेतीला मोठा फटका बसला. पिकांचे मोठे नुकसान झाले. परिणाम कांदा उत्पादनही घटले.

परिणामी दोन महिन्यांपासून या देशामध्ये कांद्याचे दर वेगाने वाढत आहेत. तसे वर्षभरापासूनच कांदा दरात येथे तेजी आहे. डिसेंबर महिन्यापासूनच लाल आणि पांढऱ्या रंगाच्या कांदा दरांत मोठी वाढ झाली आहे.

साधारणत: या देशात दर महिन्याला १७ हजार टन कांद्याची दर महिन्याची गरज असते. मात्र, प्रचंड तुटवड्यामुळे येथील स्थानिक बाजारात कांदा प्रति किलो ६०० ते ८०० फिलिपीन पेसो दराने सध्या विकला जात आहे.

चिकन-मटनाच्या दराच्याही तिप्पट दर कांद्याला मिळत असल्याने अन्य देशातून कांद्याची तस्करी सुरू झाली आहे. मागील काही दिवसांमध्ये बाहेरील देशातून बेकायदेशीरपणे कांदा विक्रीसाठी आणला जाऊ लागला आहे. असा कांदा शासकीय व्यवस्थेकडून मोठ्या प्रमाणात जप्तही करण्यात आला आहे.

भारतातून फिलिपिन्सला कांदा निर्यात

२०२०-२१--- ७१०३ टन

२०२१-२२--- १३५६६ टन

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bamboo Plantation: जलसंधारणाच्या कामावर उभे राहिले ‘बांबू बेट’

2014 Election Promises BJP: भाजपने आश्वासनांची पूर्तता करावी : खासदार अमर काळे

Farm Loan Waiver: १२ लाख शेतकऱ्यांची अट टाकून अडवणूक; कर्जमाफीवरून कैलास पाटील यांचा विधानसभेत आरोप

Sugarcane Payment Issue: ‘गोकुळ शुगर’च्या थकीत ऊसबिलांसाठी उद्या कल्याणशेट्टी यांच्या घरासमोर ठिय्या

National Krishi Shakti Award: डॉ. वसंत ढिकले यांना राष्ट्रीय ‘कृषी शक्ती पुरस्कार’

SCROLL FOR NEXT