Maharashtra Revenue Department agrowon
ताज्या बातम्या

Maharashtra Land Act : तुकडेबंदी खरेदी विक्री क्षेत्रात बदल, शासनाकडून राजपत्र प्रसिद्ध

Sale and Purchase of Land : राज्यातील महसूल विभागाकडून तुकडेबंदी कायद्यानुसार शेतकऱ्यांना बागायत २० गुंठे तर जिरायत ४० गुंठे जमिनीची खरेदी-विक्री करता येत होती.

Team Agrowon

Maharashtra Revenue Department : राज्यातील महसूल विभागाकडून तुकडेबंदी कायद्यानुसार शेतकऱ्यांना बागायत २० गुंठे तर जिरायत ४० गुंठे जमिनीची खरेदी-विक्री करता येत होती. परंतु सरकारने आता हा निर्णय बदलला आहे. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील आता बागायतीसाठी १० तर जिरायतीसाठी २० गुंठ्यांची खरेदी करण्याचा बदल करण्यात आला आहे.

महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम, १९४७ च्या यापूर्वीच्या सर्व अधिनियमात अशंतः बदल करण्यात आला आहे. त्याबाबतची अधिसूचना राजपत्राद्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. महापालिका, नगरपालिका, नगरपरिषदेची हद्द वगळून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांसाठी हा आदेश लागू होणार आहे.

पूर्वीच्या नियमानुसार खरेदी विक्री होताना शिल्लक जमिनीचा तुकडा पाडून न देण्याचा नियम होता. जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात लाखो शेतकरी या तुकडेबंदी कायद्याच्या जाचक अटीत सापडल्यामुळे जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार थांबले होते.

राज्य शासनाने अंशत: बदल करत खरेदी-विक्री व्यवहारासाठी क्षेत्राच्या मर्यादेत बदल केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.

महसूल विभागाकडून नवीन अधिसूचनेनुसार बागायत जमिनीसाठी कमीत कमी दहा गुंठे तर जिरायती जमिनीसाठी किमान २० गुंठे जमिनीची खरेदी- विक्री करण्यास परवानगी देण्यात आली.

त्यामुळे कमी क्षेत्र धारण करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. मात्र, यापूर्वी झालेल्या कमी क्षेत्राच्या खरेदी-विक्री व्यवहारातील लाखो नागरिकांसाठी मात्र, कोणताही दिलासा मिळालेला नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT