Rabi Sowing
Rabi Sowing Agrowon
ताज्या बातम्या

Rabi Sowing : रब्बी पेरणीपासून एक लाख ६४ हेक्टर क्षेत्र दूर

Team Agrowon

पुणे : यंदा परतीच्या पावसामुळे जमिनीत अधिक ओल राहिल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी पीक बदल (Crop Pattern) केला आहे. त्यामुळे रब्बी पिकांच्या क्षेत्रात (Rabi Crop) चांगलीच घट झाली आहे.

पुणे विभागात रब्बीच्या पेरणीपासून (Rabi Sowing) सुमारे एक लाख ६४ हजार ८८० हेक्टर क्षेत्र दूर राहिले आहे.

परिणामी रब्बीच्या ज्वारी, गहू, हरभरा यासह सर्वच मुख्य पिकांच्या उत्पादनात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता कृषी विभागाच्या (Agriculture Department) सूत्रांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

रब्बी हंगामात उशिराने रब्बीच्या पेरण्या झाल्या आहेत. आतापर्यंत ११ लाख ४९ हजार २६६ हेक्टरपैकी ९ लाख ८४ हजार ३७६ हेक्टर म्हणजेच ८६ टक्के पेरण्या झाल्या आहेत. अजूनही विभागात जवळपास १४ टक्के पेरण्या बाकी आहेत.

गेल्या वर्षी पुणे विभागात सरासरी १४ लाख ४९ हजार ७ हेक्टरपैकी नऊ लाख ५८ हजार ८२६ हेक्टर म्हणजेच ६६ टक्के पेरण्या झाल्या होत्या. रब्बीच्या पेरणीपासून सुमारे चार लाख ९० हजार १८० हेक्टर क्षेत्र दूर राहिले होते.

सध्या बागायत भागातील गहू, हरभरा पिके वाढीच्या व निसवण्याच्या अवस्थेत असून ज्वारी पिकाच्या काढणीस लवकरच सुरुवात होणार आहे.

नगर जिल्ह्यामध्ये हंगामातील ज्वारी पीक कणसामध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. तर काही ठिकाणी काढणीच्या अवस्थेत आहे. थंडीच्या प्रमाणात वाढ झाल्याने गहू पिकास पोषक वातावरण निर्माण झाले आहे.

गहू पिकांवर काही ठिकाणी अल्प प्रमाणात खोड किडीचा प्रादुर्भाव दिसून आला. हरभरा पीक फुलोरा ते घाटे येण्याच्या अवस्थेत आहे. पीक परिस्थिती समाधानकारक असून काही ठिकाणी घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्याने त्यावर नियंत्रणासाठी उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत.

पुणे जिल्ह्यामध्ये सरासरीच्या दोन लाख २९ हजार ७२२ हेक्टरपैकी एक लाख ६५ हजार ७९१ हेक्टरवर पेरणी झाली आहे. सद्यःस्थितीत ज्वारी पीक दाणे भरण्याच्या व काही ठिकाणी काढणीच्या टप्प्यात आहे.

हरभरा पीक घाटे पक्वतेच्या अवस्थेत असून काही ठिकाणी हरभरा पिकाच्या काढणीस लवकरच सुरुवात होणार आहे. गहू पीक ओंब्या पक्वतेच्या अवस्थेत आहे. मका पीक वाढीच्या अवस्थेत आहे. कांदा पीक वाढीच्या अवस्थेत आहे.

सोलापूर जिल्ह्यात ज्वारी पीक चांगल्या अवस्थेत असून काही ठिकाणी दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. जिरायत ज्वारी पिकास पाण्याची आवश्यकता असून बागायत ज्वारी पिकांची वाढ जोमदार आहे.

काही ठिकाणी ज्वारीवर अल्प प्रमाणात माव्याच्या प्रादुर्भावामुळे चिकटा पडला आहे. गहू पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे.

हरभरा पीक फुलोरा अवस्थेत असून काही ठिकाणी दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. हरभरा पिकांची वाढ चांगली असली तरी अल्प प्रमाणात किडीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे.

जिल्हानिहाय रब्बीची झालेली पेरणी, हेक्टरमध्ये ः

जिल्हा --- सरासरी क्षेत्र -- झालेली पेरणी -- पेरणीपासून दूर असलेले क्षेत्र

नगर --- ४,५८,६३६ -- ३,६०,६४० -- ९७,९९६

पुणे -- २,२९,७२२ --- १,६५, ७९१ -- ६३,९३१

सोलापूर -- ४,६०,९१८ -- ४,५७,९४५ -- २,९७३

एकूण -- ११,४९,२६६ --- ९,८४,३७६ --- १,६४,८८०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT