Agriculture Mechanization  Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Mechanization Subsidy : कृषी यांत्रिकीकरणाचे १ कोटीचे अनुदान वितरित

Agriculture Scheme : शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब शेतकऱ्यांनी करावा यासाठी कृषी विभागामार्फत गेल्या काही वर्षापासून यांत्रिकीकरण योजना राबविण्यात येत आहे.

Team Agrowon

Sindhudurg News : कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या कृषी यांत्रिकीकरण योजनेचा जिल्ह्यातील ८७३ शेतकऱ्यांनी लाभ घेतला असून या शेतकऱ्यांच्या खाती १ कोटी ७२ लाख ८१ हजार ७५७ रुपये इतके अनुदान जमा करण्यात आले आहे.

शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब शेतकऱ्यांनी करावा यासाठी कृषी विभागामार्फत गेल्या काही वर्षापासून यांत्रिकीकरण योजना राबविण्यात येत आहे. राज्य कृषी यांत्रिकीकरण, कृषी यांत्रिकीकरण उपअभियान आणि राष्ट्रीय कृषी विकास योजना अशा विविध योजनाच्या माध्यमातून यांत्रिकीकरणाचा लाभ दिला जातो.

या योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी शासनाने ऑनलाईन अर्ज भरण्याची सक्ती करण्यात आली आहे. दरम्यान जिल्ह्यातील १ हजार २०० हून शेतकऱ्यांनी यांत्रिकीकरणासाठी अर्ज केले होते. त्यापैकी प्राधान्यक्रमाने जिल्ह्यातील ८७३ शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला.

या शेतकऱ्यांच्या खात्यात १ कोटी ७२ लाख ७१ हजार ७५७ रुपये अनुदान जमा करण्यात आले. या योजनेतून शेतकऱ्यांना पावर टिलर, विडर, ग्रास कटर, फवारणी यंत्र, भात कापणी यंत्र, मळणी यंत्र यासह शेतीशी संबधित विविध साहित्य दिले जाते.

यांत्रिकीकरणाअंतर्गत जिल्ह्यातील सर्वसाधारण प्रभागातील ८५३ लाभार्थ्यांना आणि २० अनुसूचित लाभार्थ्यांना जून २०२३ पर्यंत १ कोटी ७२ लाख ८१ हजार ७५७ अनुदान देण्यात आलेले आहे.
- विजयकुमार राऊत, जिल्हा कृषी अधीक्षक, सिंधुदुर्ग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT