आज आपण सोयाबीन, कापूस, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि खरबुज बाजाराची माहिती घेणार आहोत.सोयाबीन स्थिरदेशातील बाजारात सोयाबीनचा भाव आज काहीसा स्थिरावला होता. प्रक्रिया प्लांट्सनी सोयाबीन खरेदीचे भाव स्थिर ठेवले होते. बाजारातील सोयाबीनची आवक सरासरीपेक्षा कमीच आहे. मात्र सध्या बाजारावर दबाव आहे. बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला सध्या सरासरी प्रतिक्विंटल ४ हजार ८०० ते ५ हजार २०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. बाजारातील सोयाबीनची आवक कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोयाबीनच्या भावात काहीशी सुधारणा होऊ शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .कापूस दबावातचसीसीआयने कापूस विक्रीचा भाव कमी केल्यानंतर बाजारावरील दबाव कायम आहे. आजही देशातील बाजारात कापसाला हमीभावापेक्षा कमी भाव मिळत आहे. सीसीआय कापसाचे भाव आणखी कमी करण्याची भीत कायम आहे. यामुळे शेतकरी पुन्हा हमीभावाने कापूस विक्रीला प्राधान्य देत आहेत. सध्या बाजारात कापूस सरासरी ७ हजार २०० ते ७ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे. बाजारातील कापसाची आवक कमी असली तरी सीसीआयच्या विक्रीचा दबाव आहे. हा दबाव कायम राहण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. .Agrowon Podcast: लिंबाच्या दरात सुधारणा; सोयाबीन हमीभावाच्या खाली, कापूस आवक कमीच, हरभरा दबावातच तर वांगी आवक सुधारली.कोथिंबीर आवक मंदावलीबाजारातील कोथिंबीर आवक काहीशी मंदावलेली दिसत आहे. काही बाजारांमध्ये आवकेत घटही दिसून आल्याचे व्यापारी सांगत आहेत. तर दुसरीकडे कोथिंबीरचे भाव स्थिरावले आहेत. कोथिंबीरला शेकडा ४०० ते ७०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. क्विंटलला गुणवत्तेप्रमाणे १ हजार ५०० ते २ हजारांच्या दरम्यान भाव मिळत आहे. कोथिंबीरची बाजारतील आवक पुढील काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज कोथिंबीर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .Agrowon Podcast: टोमॅटोवरील दबाव कायम; सोयाबीन स्थिरावले, कापूस दबावात, हळदीचा भाव टिकून तर कारले टिकून.हिरवी मिरची टिकूनराज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून हिरव्या मिरचीची आवक कमी झालेली आहे. तर दुसरीकडे मिरचीला उठाव चांगला आहे. यामुळे हिरव्या मिरचीच्या भावात सुधारणा दिसून आली आहे. हिरव्या मिरचीला सध्या बाजारात सरासरी ५ हजार ते ६ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान भाव मिळत आहे. हिरव्या मिरचीची आवक पुढील काळातही मर्यादीतच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे हिरव्या मिरचीचे भावही टिकून राहू शकतात, असा अंदाज भाजीपाला बाजारातील व्यापारी आणि जाणकार शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. .खरबुजाची आवक सुधारलीराज्यातील बाजारात मागील काही दिवसांपसून खरबुजाची आवक वाढली आहे. अनेक बाजारांमधील आवक वाढल्याचे व्यापारी सांगत आहेत. दुसरीकडे उन्हाचा चटका वाढत असल्याने खरबुजाला चांगली मागणी आहे. खरबुजाचा तोडा सध्या कमी प्रमाणात होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. तरीही खरबुजाला सध्या बाजारात सरासरी २ हजार ते ३ हजार रुपयांचा भाव मिळत आहे. खरबुजाची आवक पुढील काही दिवसांमध्ये पुन्हा सुधारण्याची शक्यता आहे. तर मागणीही वाढणार आहे. त्यामुळे दरपातळी स्थिर दिसू शकते, असा अंदाज भाजीपाला बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.