आज आपण सोयाबीन, कापूस, कांदा, काकडी आणि पपई बाजाराची माहिती घेणार आहोत.सोयाबीनमध्ये चढ उतार सोयाबीनच्या भावात आज काहीशी सुधारणा पाहायला मिळाली. प्रक्रिया प्लांट्सचे खरेदीचे भाव आज ५० ते १०० रुपयांनी वाढले होते. प्रक्रिया प्लांट्सनी आज सोयाबीनची खरेदी ५ हजार ५५० ते ५ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान केली. दुसरकडे बाजारातील सोयाबीनची आवक कमी झालेली आहे. बाजार समित्यांमध्ये सोयाबीन सरासरी ५ हजार ते ५ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान विकली जात आहे. पुढील काळात बाजारातील सोयाबीनची आवक कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोयाबीनच्या भावाला आधार राहील, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .कापूस स्थिरदेशातील बाजारात कापसाचा भाव स्थिरावला आहे. कापसाची बाजारातील आवक मर्यादीतच आहे. असे असले तरी कापसाचा भाव दबावातच आहे. देशातील बाजारात कापसाला हमीभावापेक्षा कमी भाव मिळत आहे. सध्या कपासाची विक्री प्रतिक्विंटल सरासरी ७ हजार ५०० ते ८ हजारांच्या दरम्यान केली जात आहे. देशातील बाजारावर सीसीआयच्या कापूस विक्रीचा दबाव आहे. सीसीआय कापूस विक्री करत असल्याने भाव वाढीला खीळ बसली आहे. त्यामुळे कापसाचा भाव पुढील काळातही सीसीआयच्या कापूस विक्रीनुसार बदलू शकतो, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .Agrowon Podcast: मक्याचा बाजार दबावातच; सोयाबीन स्थिर, कापसाला संथ उठाव, उडदाचा दबावातच तर भेंडी दर टिकून.कांदा दबावातराज्यातील बाजारात कांद्याची आवक वाढलेली आहे. तर दुसरीकडे कांद्याला उठाव स्थिर आहे. आवकेच्या दबावानुसार दरात मागील काही आठवड्यांमध्ये नरमाई पाहायला मिळाली. महिन्याच्या सुरुवातीला १५०० रुपयांच्या दरम्यान असलेला कांदा भाव आता एक हजारांच्या घरात पोचला आहे. कांद्याला सरासरी ९०० ते १२०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. काही बाजारांमध्ये काही कांद्याला १५०० रुपयांचा भाव मिळत आहे. पण बहुतांशी कांदा कमी भावातच विकला जात आहे. कांदा बाजारावरील दबाव कायम राहील, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .Agrowon Podcast: टोमॅटो दरात चढ उतार सुरु; सोयाबीनमध्ये चढ उतार, कापूस बाजार स्थिर, हरभरा दबावात तर डाळिंब तेजीत.काकडीला उठावराज्यातील बाजारात काकडीला मागील काही दिवसांपासून उठाव वाढला आहे. उन्हाचा चटका वाढत असल्याने काकडीला मागणी येत आहे. परंतु सध्या बाजारातील काकडीची आवकही अनेक ठिकाणी कमी आहे. त्यामुळे काकडीचे दर टिकून आहेत. सध्या काकडीला प्रतिक्विंटल सरासरी १३०० ते १८०० रुपयांच्या दरम्यान विकली जात आहे. काकडीची बाजारातील आवक पुढील काही दिवसांमध्ये काहीशी सुधारण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. .पपई खातेय भावराज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून पपईची आवक स्थिर आहे. तर दुसरीकडे पपईला मिळणारा उठाव चांगला आहे. यामुळे पपईचे भाव मागील दोन आठवड्यांमध्ये टिकून असल्याचे दिसत आहे. सध्या पपई गुणवत्तेप्रमाणे प्रक्विंटल सरासरी १५०० ते २ हजार रुपयाने विकली जात आहे. उन्हाचा चटका वाढत असल्याने पपईला उठाव मिळत आहे. पुढील काही दिवसांमध्ये मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. तसेच पपईची आवकही सुधारण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पपईचा बाजार स्थिर दिसू शकतो, असा अंदाज पपई व्यापारी आणि जाणकार शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.