भातपीक कापणीनंतरचे व्यवस्थापन
सध्या बहुतांश ठिकाणी भातपीक कापणी सुरू असून, भात धान्याची साठवण व त्यानंतर शिल्लक पेंढा व अन्य अवशेषांचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.
भात काढणीनंतर शिल्लक राहिलेल्या पेंड्याचा उपयोग जनावरांसाठी चारा म्हणून होतो. विळ्याच्या साह्याने कापलेल्या पिकाचा पेंढा व्यवस्थित वाळवून साठवावा. ज्यांनी कापणीसाठी हार्वेस्टर किंवा कापणीनंतर मळणी यंत्राचा वापर केला आहे, अशा शेतकऱ्यांना पूर्ण पेंढा मिळत नाही.
भातपीक आधारित रब्बी हंगामाचे नियोजन ः खरीप हंगामात भातपीक घेतल्यानंतर रब्बी आणि उन्हाळी हंगामात पिके घेताना आर्थिकदृष्ट्या सक्षम, जमिनीची सुपीकता टिकवणारी, समतोल पीकपद्धती निवडणे फायदेशीर ठरते. या पीक पद्धतीमध्ये, १) दुबार (Double cropping), २) रिले (Relay cropping, ३) बहुविध (Multiple cropping) असे प्रकार पडतात. योग्य पिकांची निवड करताना भौगोलिक परिस्थिती, हवामान, जमिनीची प्रत, सिंचन सुविधा, बाजारपेठ इत्यादी बाबींचा विचार करावा. या पीकपद्धतीमुळे.....
पीकपद्धती व नियोजन
खरीप भाताच्या कापणीनंतर उपलब्ध जमिनीतील फक्त ओलाव्यावर ः
उपलब्ध ओलावा आणि मर्यादित सिंचन सुविधा उपलब्ध असल्यास ः
खरीप भाताच्या कापणीपूर्वी कोणतीही मशागत न करता उपलब्ध ओलाव्यावर टोकण पद्धतीने रब्बी रिले पद्धतीने पेरून अथवा हलकी नांगरट करून थोड्या मशागतीत रब्बी पिके पाभरीने पेरतात. यामध्ये रब्बी पीक सुरवातीस उपलब्ध ओलाव्यावर चांगले येते. परंतु, नंतर वाढीच्या नाजूक अवस्थेत, फुलोऱ्यात असताना अथवा दाणे भरण्याच्या अवस्थेत संरक्षित पाणी देणे आवश्यक असते. रब्बी पिकांमध्ये ज्वारी, हरभरा, सूर्यफूल, तीळ, मका, वाटाणा पिकांची निवड करावी. सिंचन सुविधा वर्षभर उपलब्ध असल्यास ः अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी बहुविध पीकपद्धतींचा अवलंब करताना जमिनीचा कस सांभाळण्याकडेही लक्ष द्यावे. खरीप भाताच्या कापणीनंतर भाजीपाला लागवड ही लोकप्रिय पीकपद्धती आहे. यामध्ये सर्वसाधारणपणे रब्बी व उन्हाळी हंगामातही योग्य नियोजन करावे लागते.
खरीप भात ः रब्बी भाजीपाला पिके ः उन्हाळी मूग/ भुईमूग/ बाजरी. खरीप भात ः रब्बी-उन्हाळी भाजीपाला पिके. खरीप भात ः उन्हाळी भात. खरीप भात ः उन्हाळी भुईमूग/ वैशाखी मूग.
अशा प्रकारे भातपीक कापणीनंतर योग्य व्यवस्थापन व नियोजन केल्यास आर्थिक नुकसान कमी होईल, पर्यावरणास व मानवी आरोग्यास हानी कमी होईल. रब्बी हंगामाचे योग्य नियोजन केल्यास शेतकऱ्यास दुहेरी व बहुहंगामाचा आर्थिक लाभ मिळेल.
संपर्क ः डॉ. नरेंद्र काशिद, ९४२२८५१२०५ (कृषी संशोधन केंद्र, वडगाव मावळ, जि. पुणे)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.