लिंबूवर्गीय फळपिकांमध्ये रस शोषक पतंगामुळे सुमारे ५० ते ६० टक्क्यापर्यंत नुकसान होऊ शकते. या किडीचा जीवनक्रम समजून घेऊन वेळीच प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्याची आवश्यकता आहे. रस शोषक पतंग हे मोठ्या आकाराचे व आकर्षक रंगाचे असतात. रस शोषक पतंगाच्या ओथ्रिस मॅटरना, ओथ्रिस फुलोनिका व अकिया जनाटा अशा विविध प्रजाती आढळून येतात. ओथ्रिस मॅटरना : समोरील पंख तपकिरी रंगाचे असून, मागील पंख नारंगी रंगाचे असतात. मागील पंखावर मध्यभागी एक काळा ठिपका असतो. पंखाच्या कडा काळ्या रंगाच्या असून त्यावर पांढरे ठिपके असतात. ओथ्रिस फुलोनिका : मागील पंख नारंगी रंगाचे असून, त्यावर मध्यभागी इंग्रजी 'C' अक्षरासारखा काळा ठिपका असतो. अकिया जनाटा : समोरील पंख तपकिरी व मागील पंख पांढरे असून त्यावर काळे चट्टे असतात. हे रस शोषणारे पतंग मोसंबी, संत्री फळाव्यतिरिक्त डाळिंब, आंबा, द्राक्ष इ. फळांवरही प्रादुर्भाव करतात. या पतंगांचा प्रादुर्भाव तुलनात्मकदृष्ट्या उशिराचा आंबिया बहार आणि मृग बहरात जास्त प्रमाणात दिसून येतो. ऑगस्ट ते ऑक्टोबर या पावसाळी कालावधीत प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असतो. पावसाळी हवामानात जून ते ऑगस्ट कालावधीत जीवनक्रम पूर्ण होऊन या किडीचे पतंग बाहेर पडतात. त्यांच्या प्रौढ होईपर्यंतचा जीवनक्रम आज आपण जाणून घेऊ. जीवनक्रम
नुकसान : फक्त प्रौढ पतंग अवस्था फळाचे नुकसान करते. हे पतंग निशाचर असून सर्वसाधारणपणे दिवस मावळल्यापासून ते मध्य रात्रीपर्यंत पतंगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. बागेतील पक्व फळ शोधून त्यावर पतंग बसतात. आपल्या सोंडेने फळांना सूक्ष्म छिद्र पाडून त्यात सोंड खुपसून आतील रस शोषतात. कालांतराने छिद्र पडलेल्या जागेवर गोलाकार तपकिरी चट्टा तयार होतो. त्या जागी फळ सडण्यास सुरवात होते. त्या जागी बुरशींचा शिरकाव होऊन अशी प्रादुर्भावग्रस्त फळे गळून पडतात. पतंगामुळे जर फळगळ झाली असल्यास पडलेली फळे दाबल्यास त्यातून रस निघतो. फळांची प्रत कमी झाल्याने अशी फळे विक्री योग्य राहत नाहीत. छायाचित्र ः PNE20R08743 रसशोषक पतंगामुळे पडलेला चट्टा व्यवस्थापन :
डॉ. संजोग बोकन (संशोधन सहयोगी ), ९९२१७५२००० डॉ. अनंत बडगुजर (सहाय्यक प्राध्यापक), ७५८८०८२०२४ (कृषी कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.