पेरणी १५ जून ते १० जूलै दरम्यान करावी. पेरणीसाठी दोन चाड्याच्या तिफणीचा वापर करावा. दोन ओळीमध्ये ४५ सेंमी अंतर ठेवून पेरणी करावी. उगवणीनंतर १२ ते १५ दिवसांनी दोन रोपांत १० ते १२ सेंमी अंतर ठेवून विरळणी करावी. एका ठिकाणी एकच जोमदार रोप ठेवावे. खरीप ज्वारी ही मुख्यत्वे करून कोरडवाहू पीक म्हणून घेतली जाते. लागवडीसाठी मध्यम ते खोल, भारी व पाण्याचा चांगला निचरा होणारी, सामू ५.५ ते ८.५ असलेली जमीन निवडावी. जास्त हलक्या जमिनीत लागवड करू नये. ज्वारी पिकासाठी दरवर्षी नांगरणी करण्याची आवश्यकता नसते. नांगरणी २ ते ३ वर्षातून एकदा करावी. पीक काढल्यानंतर लगेच नांगरट करावी. पाऊस पडल्यानंतर ३ ते ४ वेळा वरखणी करून जमीन तयार करावी. खरीप हंगामासाठी एप्रिल ते मे महिन्यात पहिली वखराची खोल पाळी देवून कुळवाच्या २ ते ३ पाळ्या द्याव्यात. संकरीत व सुधारीत वाण
वाण | परिपक्वतेस लागणारा कालावधी (दिवस) | हेक्टरी उत्पादन(क्विं.) |
अ)लवकर येणारे संकरित वाण | ||
सी.एस.एच-१४ | १०० ते १०५- | ४८ ते ५० |
सी.एस.एच-१७ | १०० ते १०५ | ४२ ते ४५ |
सी.एस.एच-३० | १०० ते १०५ | ४० ते ४५ |
ब)मध्यम कालावधीचे संकरित वाण | ||
सी.एस.एच-९ | ११० ते ११५- | ४८ ते ५० |
सी.एस.एच-१६ | ११० ते ११५ | ४५ ते ५० |
सी.एस.एच-२५ | -११० ते ११५ | ४५ ते ५० |
एस.पी.एच-१६३५- | ११० ते ११५- | ४८ ते ५० |
सी.एस.एच-३५ | ११० ते ११५ | ४८ ते ५० |
क) सुधारीत वाण | ||
सी.एस.व्ही-२० | ११५ ते १२० | ३६ ते ३८ |
सी.एस.व्ही-२७ | ११० ते ११५ | २५ ते ३० |
सी.एस.व्ही-३४ | ११० ते ११२ | ३८ ते ४० |
बियाणे लागवडीसाठी हेक्टरी ७.५ ते १० किलो बियाणे पूरेसे आहे. पेरणीसाठी दोन चाड्याच्या तिफणीचा वापर करावा. जेणेकरून पेरणीसोबत खते देता येतात. बीजप्रक्रिया
पेरणीची वेळ
पेरणी पद्धत
खत व्यवस्थापन
आंतरमशागत पेरणी उताराला समांतर न करता उताराला आडवी आणि कंटूर पध्दतीने करावी. सुरवातीच्या ३५ ते ४० दिवसांत तण व पिकामध्ये अन्नद्रव्ये जमिनीतून शोषण्यासाठी तीव्र स्पर्धा असते. त्यामुळे सुरवातीचे ३५ ते ४० दिवस पीक तण विरहीत ठेवावे. पेरणीपूर्वी जांभूळवाही द्यावी. पेरणीनंतर आवश्यकतेनुसार १ ते २ निंदण्या आणि २ ते ३ वेळा डवऱ्याच्या पाळ्या द्याव्यात. पाणी व्यवस्थापन पीक वाढीच्या नाजूक अवस्थेत असताना पिकांस पाण्याचा ताण पडू देऊ नये. पीक वाढीच्या नाजूक अवस्था
वाढीची अवस्था | पेरणीपासून दिवस |
पिकाची जोमदार वाढीची सूरूवात | २५ ते ३० |
पीक पोटरीत येण्याचा काळ | ५० ते ५५ |
पीक फुलोऱ्यात येण्याचा काळ | ७० ते ७५ |
दाणे भरण्याचा काळ | ९० ते ९५ |
कीड व्यवस्थापन खोडमाशी
खोडकिडा
मिजमाशी डायमेथोएट (३० टक्के प्रवाही) २ मिलि प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. संपर्क - डाॅ. गोपाल ठाकरे,९५५२६८०८८८ डाॅ.आर.बी. घोराडे,९८५०७२३७०६ (ज्वारी संशोधन विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.