आपल्या भागातील हवामान, भौगोलिक परिस्थिती आणि जमिनीचा प्रकार यांचा विचार करूनच बांबूच्या विविध प्रजातींची लागवड करावी. कृषी विद्यापीठे आणि कृषी विज्ञान केंद्रांनी शास्त्रीय पद्धतीने बांबूच्या नवीन जातींचा अभ्यास करून लागवडीबाबत शिफारशी करणे शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणार आहे.
गेल्या महिन्यात महाराष्ट्र शासनातर्फे 'अटल बांबू समृद्धी योजना' राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. सदर योजनेअंतर्गत उत्तम गुणधर्म असलेल्या टिश्यू कल्चर बांबू रोपांची निर्मिती राज्यामध्येच करून ती शेतकऱ्यांना शेतजमिनीवर तसेच शेताच्या बांधावर लागवडीकरिता सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना लागवडीस बांबू रोपे सहज आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. साहजिकच बांबू लागवडीमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यास या योजनेमुळे मदतच होईल.
बांबू लागवडीसाठी उपक्रम बदलत्या हवामानाचा विचार करता सध्या बांबूकडे शेतकरी एक खात्रीशीर पीक म्हणून पाहात आहेत. कारण अवकाळी पाऊस, रोग व किडीचा फारसा दुष्परिणाम या पिकावर होत नाही. सध्या कोकणापुरता जरी विचार केला तरीही हे लक्षात येते की बांबू लागवडीसाठी हातभार लागावा या हेतूने शासकीय संस्था त्यांच्या परीने विविध उपक्रम राबवित आहेत. उदाहरणार्थ, बांबूचे फायदे लक्षात घेऊनच दापोली येथील वनशास्त्र महाविद्यालयामार्फत ''राष्ट्रीय कृषी विकास'' योजनेअंतर्गत कृषी महाविद्यालयाच्या माजी शिक्षण घेतलेल्या होतकरू विद्यार्थ्यांना बांबू रोपे तयार करण्यासाठी दापोली, देवरुख (जि. रत्नागिरी) आणि कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग (जि. सिंधुदुर्ग) या ठिकाणी रोपवाटिका उपलब्ध करून दिल्या आहेत. या रोपवाटिकांमधून स्थानिक ‘माणगा' प्रजातीची बांबू रोपे शाखीय पद्धतीने विकसित करून रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच इतर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली जातात. परंतु शेतकऱ्यांची वाढती मागणी पाहता या पद्धतीने रोपे मुबलक प्रमाणात तयार करणे फार जिकरीचे आहे. अशा परिस्थितीत म्हणूनच शेतकऱ्यांना टिश्यू कल्चर रोपे उपलब्ध करून देण्याचा शासनाचा निर्णय अत्यंत स्वागतार्ह आहे.
नवीन प्रजातींच्या अभ्यासाची गरज
- सतीश वनगे, ९४२२४२३२९२
(लेखक वनशास्त्र विषयाचे पदवीधर आहेत.)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.